Join us  

हिवाळ्यात तातडीने करा ३ महत्वाची कामं, वाढत्या थंडीत दगदग नको असेल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2023 5:29 PM

Do 3 important Household tasks in winter.. : हिवाळ्यात आळस वाढतो, निवांत झोपावंसं वाटतं त्यामुळे काही कामं वेळेवर केलेली बरी

आला थंडीचा महिना...सध्या सर्वत्र थंडी जाणवू लागली आहे. गार वाऱ्यामुळे अंगावर शहारे येतात. बऱ्याच जणांना थंडीच्या दिवसात बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. ज्यामुळे ते अधिक वेळ घरात राहून विश्रांती घेतात. पण यामुळे बाहेरची बरीचशी कामं रखडली जातात. याशिवाय आळस येतो तो वेगळाच.

थंडीच्या दिवसात बाहेर पडून काम करणं असो किंवा घरातली कामं, असे अनेक कामं आहेत, जी थंडीच्या दिवसात करण्याची इच्छा होत नाही. जर आपल्यालाही थंडीच्या दिवसात जास्त काम करण्याची इच्छा होत नसेल, तर ही मुख्य कामं आजच आटोपून घ्या. कारण थंडीचा महिना अजून संपलेला नाही. थंडी वाढण्याच्या आधी ही कामं पूर्ण करून घ्या(Do 3 important Household tasks in winter..).

घरात किराणा आणून ठेवा

कडाक्याची थंडी पडली की, आपण घराबाहेर पडणं टाळतो. अशावेळी घरातल्या काही गोष्टी संपल्या, की बाहेर जाणं अक्षरशः जीवावर येतं. अशावेळी पूर्वीच एक्स्ट्रा किराणा माल भरून ठेवा. लागणाऱ्या वस्तू एक्स्ट्रा भरून ठेवा. जेणेकरून आपल्याला बाहेर पडण्याची गरज भासणार नाही. तांदूळ, पीठ, मसाले इत्यादी काही गोष्टी दीर्घकाळ टिकतात. आपण हे वस्तू घरी आणून स्टोर करून ठेऊ शकता.

थर्टी फस्ट घरीच साजरा करणार? ६ आयडिया, सेलिब्रेशन होईल यादगार, पार्टी होईल जबरदस्त

ब्लँकेट धुवून घ्या

थंडी सुरू झाल्यानंतर जाड कपडे स्वच्छ करणे कठीण होऊन जाते. अशा वेळी जाड गादी किंवा ब्लँकेट धुवून घ्या. कारण हिवाळ्यात यांचा वापर जास्त होतो. त्यामुळे ऐन हिवाळ्यात स्वच्छ करण्यापेक्षा आताच धुवून ठेवा. शिवाय धुवून झाल्यानंतर गादीवर बेडशीट घालून कव्हर करा. जेणेकरून गादी लवकर खराब होणार नाही.

केवढा मोठा पराठा...! आनंद महिंद्रांनी शेअर केला प्रचंड मोठ्या पराठ्याचा व्हिडिओ, अभिषेक बच्चनही म्हणाला..

पडद्यांची सफाई

थंडी सुरू होण्यापूर्वी घरातील सर्व पडदे स्वच्छ धुवून घ्या. पडदे एकदा स्वच्छ झाल्यानंतर वारंवार साफ करण्याची आपल्याला गरज भासणार नाही. तीन महिन्यांपर्यंत पडदे स्वच्छ क्लिन दिसतात. थंडीच्या दिवसात पाणी देखील थंड असते, त्यामुळे आपल्याला थंड पाण्यात पडदे धुण्याची वेळ येणार नाही.

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सथंडीत त्वचेची काळजीसोशल मीडियासोशल व्हायरल