पूर्वीच्या काळी सकाळ झाली की आजोबा हातात आकड्याची काठी घेऊन बागेत फेरफटका मारायला जायचे. पिशवी भरून किंवा परडी भरून फुले घेऊन यायचे. (Do flowers fade quickly? 6 solutions to keep flowers beautiful , fresh and vibrant for many days)जास्वंद, बकुळ, चाफा, मोगरा, पारिजात, केवडा, गुलाब इतरही अनेक फुले असायची. आजही गावांमध्ये फुले अशीच तोडून आणली जातात. बागेमध्ये फुलझाडे तर असतातच. रोज छान ताजी टवटवीत फुले वाहायला, फुलदाणीमध्ये ठेवायला तसेच कोणाला द्यायला वापरता येतात. शहरासारख्या ठिकाणी आता मात्र फुले विकत आणायला लागतात. (Do flowers fade quickly? 6 solutions to keep flowers beautiful , fresh and vibrant for many days)फुलांचे भाव तर काही विचारूच नका. चाफा तर परवडत नाही आजकाल. भाज्या आणि फळांपेक्षा फुले महाग झाली आहेत. गॅलरी किंवा बाल्कनीमध्ये झाडे लावायची म्हटले तरी बंधने येतातच. काही ठराविकच रोपे लावता येतात.
ज्यांच्याकडे तेवढीही जागा नाही त्यांना फुले विकत आणण्याशिवाय पर्याय नाही. (Do flowers fade quickly? 6 solutions to keep flowers beautiful , fresh and vibrant for many days)मात्र फुले फुल मार्केटला जाऊन आणणेच परवडते. त्यामुळे एकदाच आठवड्याभरासाठी फुले घेऊन यायची. असं अनेक जण करतात. पण ती फुले लवकर कोमेजायला लागतात. तशीच कोमेजलेली फुले वापरणे योग्य दिसत नाही. या काही ट्रिक्स वापरून बघा. फुले लगेच खराब होणार नाहीत. तसेच बरेच दिवस टिकतीलही. एकदाच भरपूर फुले आणून ठेवण्यातही मग काही हरकत नाही.
१. फुले आपण फ्रिजमध्येच ठेवतो. ती फ्रिजमध्येच छान ताजी राहतात. बाहेर ठेवल्यास एका दिवसामध्येच खराब होऊन जातात. त्यामुळे फुले फ्रिजमध्येच ठेवा.
२. पातळ कॉटनचे कापड ओले करा. ते छान घट्ट पिळा. नंतर त्यामध्ये फुले ठेवा. फडका व्यवस्थित गुंडाळा. चारही बाजूंनी झाकून घ्या. मग फ्रिजमध्ये ठेवा. फुले छान राहतात.
३. झेंडूची फुले केळीच्या पानामध्ये बांधायची. आणि मग ते पान प्लास्टिकच्या डब्यात ठेवायचे. फुले अनेक दिवस ताजी राहतात.
४. फुलदाणीमध्ये फुले ठेवताना फुलदाणी शक्यतो तांब्याची वापरा. त्यामध्ये फुले जास्त काळ ताजी राहतात. तसेच फुलदाणीमध्ये पाण्याबरोबर बर्फाचे काही खडे टाका.
५. फुलदाणीमध्ये थोडासा लिंबाचा रस पिळा आणि मग बघा फुले पटकन कोमेजणार नाहीत.
६. फुलदाणीमध्ये ठेवलेल्या फुलांचे देठ दर रोज खालच्या बाजून थोडे-थोडे कापायचे असे केल्यानेही फुले जास्त दिवस टिकतात.