Lokmat Sakhi >Social Viral > कितीही गर्दी असो डास तुम्हालाच चावतात? काही माणसांनाच डास फार चावतात त्याची ५ कारणं..

कितीही गर्दी असो डास तुम्हालाच चावतात? काही माणसांनाच डास फार चावतात त्याची ५ कारणं..

Mosquito Bite: असा अनुभव खूप जणांना येतो. बाकी खूप जण आसपास असतात. पण डास मात्र बरोबर येऊन त्यांनाच चावतात. बघा असं नेमकं का होतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 02:02 PM2022-09-16T14:02:26+5:302022-09-16T14:04:28+5:30

Mosquito Bite: असा अनुभव खूप जणांना येतो. बाकी खूप जण आसपास असतात. पण डास मात्र बरोबर येऊन त्यांनाच चावतात. बघा असं नेमकं का होतं..

Do mosquitoes always bite you no matter how crowded? 5 reasons why only some people are bitten by mosquitoes. | कितीही गर्दी असो डास तुम्हालाच चावतात? काही माणसांनाच डास फार चावतात त्याची ५ कारणं..

कितीही गर्दी असो डास तुम्हालाच चावतात? काही माणसांनाच डास फार चावतात त्याची ५ कारणं..

Highlightsप्रत्येक घरात एक तरी व्यक्ती अशी असतेच की तिला नेहमीच इतरांपेक्षा जास्त डास चावतात.

आपल्या आजूबाजूला काही जण असे असतात, किंवा बऱ्याचदा आपणही त्यांच्यातलेच एक असतो, ज्यांना खूपच डास चावतात. खाजवून खाजवून किंवा मग डास (mosquito bite) मारून मारून ही मंडळी एकीकडे बेजार झालेली असतात. पण त्याचवेळी या लोकांच्या शेजारी बसलेल्या अन्य व्यक्ती मात्र एकदम रिलॅक्स असतात. कारण त्यांना डासच चावलेला नसतो. प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती अशी असतेच की तिला नेहमीच इतरांपेक्षा जास्त डास चावतात. (4 reasons why only some people are bitten by mosquitoes) म्हणूनच अशा व्यक्तींकडे बघून प्रश्न पडतोच की या लोकांनाच कसे बरे डास चावतात? त्याच प्रश्नाचं हे घ्या नेमकं उत्तर.

 

काही लोकांनाच खूप डास का चावतात?
१. रक्तगट 

ज्या लोकांचा रक्तगट ओ प्रकारातला असतो, त्या व्यक्तींना इतर व्यक्तींच्या तुलनेत अधिक डास चावतात. कारण या व्यक्तींच्या रक्तगटाकडे डास आकर्षित होतात.

सारा अली खानचा चमचमता मिनी ड्रेस... ८० हजाराच्या या ड्रेसची बघा नेमकी खासियत 

२. चयापचय क्रिया
ज्या व्यक्तींची चयापचय क्रिया अधिक वेगवान असते म्हणजेच ज्यांचा मेटाबॉलिक रेट जास्त असतो, अशा व्यक्तींनाही इतर व्यक्तींच्या तुलनेत अधिक डास चावतात.

 

३. घामातील घटक
ज्या व्यक्तींच्या घामामध्ये लॅक्टिक ॲसिड, अमोनिया यासारख्या घटकांचं प्रमाण अधिक असतं, त्या व्यक्तींकडे डास अधिक आकर्षित होतात. यासाठी घाम कमी येतो की जास्त हे महत्त्वाचं नाही. तर घामात वरील घटकांचं प्रमाण किती त्यावर डासांचं चावणं अवलंबून असतं. 

पावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घ्या खास रेसिपी - ५ सोप्या टिप्स - इडल्या होतील हलक्या - स्पोंजी

४. शरीरावरील बॅक्टेरिया
ज्या व्यक्तींच्या शरीरावर अधिक बॅक्टेरिया असतात, त्यांना डास जास्त चावतात. बऱ्याचदा आपल्या पायाला डास जास्त चावतात, याचं कारण हेच असतं की इतर शरीराच्या तुलनेत पायांवर बॅक्टेरियाचं प्रमाण अधिक असतं. 

 

५. कार्बन डायऑक्साईड
ज्या व्यक्तींच्या शरीरात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण अधिक असतं, त्यांना अधिक डास चावतात. ज्या व्यक्तींना वारंवार जांभया येतात किंवा ज्या व्यक्ती खूप मोठा श्वास घेतात, त्या व्यक्तींच्या शरीरात कार्बन डाय ऑक्साईडचं प्रमाण अधिक असतं.  
 

Web Title: Do mosquitoes always bite you no matter how crowded? 5 reasons why only some people are bitten by mosquitoes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.