Join us

मनमोकळ्या मुली हिंट देतात? गिरीजा ओक म्हणते, मुलींचा स्वभाव नाही तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2025 18:38 IST

Do open-minded girls give hints? : एखादी मुलगी आपल्याशी बोल्ली म्हणजे भाव देतेय ही लोकांची थिल्लर मानसिकाता. ऐका गिरीजाचे मत.

बरेचदा कामाच्या ठिकाणी असेल किंवा कोणत्या अन्य ठिकाणी असेल, आजकालच्या मुली मन मोकळेपणाने बोलतात.(Do open-minded girls give hints?) त्यांच्यात स्वत:चे मत मांडण्याचा आत्मविश्वास असतो. काही जणी एखाद्या गटात पटकन मिसळून जातात. काहींना वेळ लागतो. पण हा स्वभावाचा भाग झाला, त्यात स्त्री-पुरुष हा विषय येत नाही.(Do open-minded girls give hints?) काही स्त्रियांचा स्वभाव खुलून बोलायचा असतो. अशा मनमोकळ्या बोलणाऱ्या महिलांना आजकाल अवेलेबल किंवा ओपन अशा थिल्लर नावांनी ओळखले जाते. त्यांच्याकडे बघायची नजर लोकांची बदलून जाते. असे वर्गीकरण फक्त पुरुष करतात असे नाही. महिलासुद्धा करतात.

आरपार या चॅनलशी संवाद साधताना गिरीजा ओकने या अशा मानसिकतेवर टिका करत आपले मत स्पष्टच मांडले. ती म्हणाली, आता या पलिकडे जायला हवं. स्त्रियांनी कोणाशी बोलावं, कोणाशी बोलू नये, किती बोलावं हे त्यांचं त्यांना ठरवू द्या. लोकांच्या संशयीत नजरा मला गप्प राहायला प्रवृत्त करतात. महिलांनी मन मोकळेपणाने बोलणे हा एखाद्यासाठी इशार असूच कसा शकतो?(Do open-minded girls give hints?) पुढे गिरीजाने तिचा स्वतःचा अनुभव सांगताना सर्वच महिलांच्या मनाची होणारी तगमग मांडली आहे. ती म्हणते, मला मत मांडताना किंवा संवाद साधताना मी चुकीची कल्पना तर देत नाही आहे ना अशी शंका सतत मनात येते. पण जर एखादी स्त्री मनमिळाऊ आहे तर ती पुरुषांना इशारे करते हा तर्क लावणं फार चुकीचं आहे.

गिरीजाने मांडलेली तिची व्यथा खरंतर प्रत्येक काम करणाऱ्या स्त्रीची असते. एखाद्याशी बोलताना तो कोणत्या अर्थी आपला संवाद पाहत आहे हे सांगता येत नाही. अशा वेळी महिला न बोलणं पत्करतात. पण मग ते बरोबर आहे का? महिलांनी सतत मत मांडल्याने सुसंवाद साधल्यावरच ही मानसिकता दूर होऊ शकते.

तुम्हीही अशा पेचात पडत असाल तर स्वतःच्या मोकळ्या बोलक्या स्वभावाला दोष अजिबात देऊ नका. गिरीजाने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला स्वभाव बदलायची नाही तर समाजाला मानसिकता बदलायची गरज आहे.

टॅग्स :महिलानोकरीगिरिजा ओक