Join us  

तुम्ही पण सुर्रर्र करून नूडल्स खाता? जगभरात माणसं चुकीच्याच पद्धतीने खातात नूडल्स, पाहा योग्य पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2022 4:10 PM

How To Eat Noodles Properly?: नूडल्स खाण्याची पारंपरिक पद्धत नेमकी कोणती, आपण ज्या पद्धतीने खातो, ते नेमकं चूक मानायचं की बरोबर?

ठळक मुद्दे नूडल्स खाण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती, आपण ज्या पद्धतीने नूडल्स खातो ते चुकीचं की बरोबर?

चारचौघांसमोर नूडल्स खाताना काही जणांना टेन्शन येतं.. स्पेशली नूडल्स सूप असेल तर ते खाताना तर जाम गोंधळ होतो.. फोक वापरून नूडल्स (noodles) खायच्या असतील, तर ते आता बऱ्याच जणांना व्यवस्थित जमतं. पण चॉपस्टिकचा वापर करायचा असेल तर मात्र नको त्या नूडल्स खाणंच नको, असं होऊन जातं. नूडल्स खाण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती, आपण ज्या पद्धतीने नूडल्स खातो ते चुकीचं की बरोबर, नूडल्स खाण्याची पारंपरिक पद्धत (traditional method of eating noodles) नेमकी कोणती, याविषयी बघा ही सविस्तर माहिती. 

 

प्रत्येक पारंपरिक पदार्थ खाण्याची एक विशिष्ट पद्धत असते. उदाहरणार्थ पुरणाची पोळी गरमागरम आणि तूप टाकून खावी. इडली सांबार किंवा चटणीसोबत खावी, श्रीखंड खाण्यासाठी चमचा- वाटी यांचा उपयोग करावाच..तसंच नूडल्स या पारंपरिक पदार्थाचंही आहेच. आता आपण आपल्या स्टाईलने नूडल्स बनवत आणि खात असलो तरी नूडल्स करण्याची आणि खाण्याची एक पारंपरिक पद्धत आहे. आणि नूडल्स खाण्याची पारंपरिक पद्धतच नेमकी आपल्याला चुकीची वाटते, असं जापानी खाद्य विशेषज्ञ बोनी चुंग यांचं मत आहे. मग कशी बरं नूडल्स खाण्याची योग्य पद्धत?

 

तुम्ही कधी लक्ष देऊन पाहिलंय का की तुमच्या सभोवतालची लहान मुलं मॅगी (maggi) कशी खातात? ते सरळ त्यांचा मॅगीचा कटोरा हातात उचलतात. किंवा मग टेबलवर मॅगीचा कटोरा किंवा डिश असेल तर तोंड खाली झुकवून डिशकडे नेतात. फोकने मॅगीचे टोक पकडून तोंडात टाकतात आणि उरलेली मॅगी सुर्रर्र करून तोंडात अलगद किंवा झटकन ओढून घेतात. आता चारचौघांसमोर मोठी माणसं अशा पद्धतीने मॅगी किंवा नूडल्स खाताना कचरतात. किंवा लहान मुलं जर अशा पद्धतीने मॅगी खात असतील तर त्यांनाही रागावतात.

 

पण बोनी चुंग यांच्यामते मॅगी खाण्याची हीच खरी योग्य आणि पारंपरिक पद्धत आहे. अनेक जणांना नूडल्स खाण्याचा हा प्रकार अतिशय ‘rude’ वाटतो. अशा पद्धतीने मॅगी किंवा नूडल्स खाण्याचा आनंद आपण कधी ना कधी एकटे असताना किंवा आपल्या घरच्या मंडळींसोबत असताना घेतलेलाच असतो.. खरं तर तसं खाण्यातच खरी गंमत आहे, हे आपणही अनुभवलेलं असतंच,.. हो ना? 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नपाककृतीजपान