Lokmat Sakhi >Social Viral > लोकरीच्या उबदार कपड्यांवर गोळे आल्याने जुने दिसतात? ५ ट्रिक्स, बुंदके निघून कपडे दिसतील नवेकोरे...

लोकरीच्या उबदार कपड्यांवर गोळे आल्याने जुने दिसतात? ५ ट्रिक्स, बुंदके निघून कपडे दिसतील नवेकोरे...

Do You Also Get Balls On Your Woolen Clothes Then Follow These Tips : How to Remove Lint : ​How to remove lint from woolen clothes during winter season : हिवाळ्यात सतत लोकरीचे कपडे वापरुन त्यांना गोळे आले असतील तर करुन पाहावेत असे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2024 16:09 IST2024-12-06T16:08:59+5:302024-12-06T16:09:51+5:30

Do You Also Get Balls On Your Woolen Clothes Then Follow These Tips : How to Remove Lint : ​How to remove lint from woolen clothes during winter season : हिवाळ्यात सतत लोकरीचे कपडे वापरुन त्यांना गोळे आले असतील तर करुन पाहावेत असे उपाय...

Do You Also Get Balls On Your Woolen Clothes Then Follow These Tips How to Remove Lint ​How to remove lint from woolen clothes | लोकरीच्या उबदार कपड्यांवर गोळे आल्याने जुने दिसतात? ५ ट्रिक्स, बुंदके निघून कपडे दिसतील नवेकोरे...

लोकरीच्या उबदार कपड्यांवर गोळे आल्याने जुने दिसतात? ५ ट्रिक्स, बुंदके निघून कपडे दिसतील नवेकोरे...

सध्या सगळीकडे बऱ्यापैकी थंडी (How to Remove Lint) पडायला सुरुवात झाली आहे. वातावरणातील गारठा वाढू लागला आहे. या हुडहुडी भरवणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण सगळेच उबदार कपड्यांचा वापर करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या चादरी, जाडजूड ब्लँकेट्स, लोकरीचे स्वेटर्स, कानटोपी, शाल अशा अनेक उबदार गोष्टींचा (How to remove lint from woolen clothes during winter season) वापर थंडीत केला जातो. थंडीतील उबदार कपडे म्हटलं की ते शक्यतो लोकरीचा वापर करुन तयार केले जातात. अशा लोकरीच्या कपड्यांची वेळीच योग्य ती काळजी घ्यावी लागते(Do You Also Get Balls On Your Woolen Clothes Then Follow These Tips).

थंडीच्या दिवसांत लोकरीच्या कपड्यांची अधिक गरज भासते, पण हे कपडे जास्त वापरल्यावर याला गोळे येतात. लोकरीच्या कपड्यांना गोळे येऊ लागले की असे कपडे जुने दिसू लागतात. थंडीच्या दिवसात शरीर उबदार ठेवण्यासाठी लोकरीचे कपडे घालणे अधिक फायदेशीर ठरते, परंतु हे कपडे जसे उबदारपणा देतात तसेच तितक्याच नाजूक पद्धतीने त्यांची काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात सतत लोकरीचे स्वेटर वापरुन जर का त्यांना गोळे आले असतील तर नेमके काय उपाय करावेत ते पाहूयात. 

हिवाळ्यात वापरल्या जाणाऱ्या लोकरीच्या कपड्यांवर गोळे आलेत? 

१. कपड्यांवरील लेबल :- लोकरीपासून तयार करण्यात आलेले कोणत्याही प्रकारचे कपडे धुण्याआधी त्यावरील लेबल जरुर वाचावे. त्या लेबल ते कपडे कोणत्या प्रकारे धुवायचे याची सगळी माहिती दिलेली असते. ही माहिती फॉलो करुनच मग त्या पद्धतीने लोकरीचे कपडे धुवावेत. अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने कपडे धुतल्याने देखील लोकरीच्या कपड्यांवर गोळे येतात. 

२. लोकरीचे कपडे घालून झोपणे :- हिवाळ्यात बहुतेक लोक लोकरीचे कपडे घालून झोपतात. यामुळे कपड्यांवर फक्त गोळे दिसत नाही तर त्यांचा रंगही निखळू लागतो. लोकरीचे कपडे घालून झोपल्यामुळे काही लोकांना खाज आणि ऍलर्जीचा त्रासही होतो.

वॉशिंगमशीनमध्ये रंगीत आणि पांढरेशुभ्र कपडे एकत्र धुणे झाले सोपे, घ्या 'हा' जादुई कागद...

चक्कू छुरिया तेज करा लो, ते ही घरच्याघरी ! ८ ट्रिक्स- सुरी होईल धारदार तेज...

३. कंगवा :- लोकरीच्या कपड्यांवरील गोळे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कंगवा वापरू शकता. अशा स्थितीत कंगवा कापडावर ठेवा आणि केसांप्रमाणे वरपासून खालपर्यंत फिरवा. त्यामुळे लोकरीचे गोळे कंगव्यात अडकतात. तुम्हाला हवे असल्यास कपड्यांवरील गोळे लवकर साफ करण्यासाठी तुम्ही रेझरचा देखील  वापर करू शकता.

४. वेल्क्रो स्ट्रिप :- वेल्क्रो स्ट्रिपसच्या मदतीने आपण लोकरीच्या कपड्यांवर आलेले गोळे चटकन काढू शकतो. वेल्क्रो स्ट्रिप्स सामान्यतः शूज किंवा बॅगवर दिसतात. त्याचा चिकट भाग या कपड्यांवरील गोळे काढण्यास मदत करतो. त्यासाठी वेल्क्रोची एक पट्टी घेऊन ज्या भागावर गोळे आले आहेत त्या भागावर  हलक्या हाताने लावा आणि थोड दाबा. या ट्रिकमुळे लिंट आणि गोळे चटकन निघतील. 

५. व्हाईट व्हिनेगर :- व्हाईट व्हिनेगरच्या मदतीने लोकरीच्या कपड्यांवर आलेले गोळे अगदी सहजपणे काढू शकता. लोकरीचे कपडे धुताना पाण्यात एक कप व्हाईट व्हिनेगर घाला. मग अशा पाण्यांत लोकरीचे कपडे धुवा. व्हाईट व्हिनेगर सहजपणे लोकरीच्या कपड्यांना आलेले गोळे अगदी सहजपणे काढण्यास मदत करतात. 

इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. लोकरीच्या कपड्यांमधील होणारे घर्षण कमी केल्यास त्यावर फारसे गोळे येत नाहीत. त्यामुळे असे लोकरीचे उबदार कपडे धुताना ते नेहमी उलटे म्हणजेच आतील बाजू बाहेर काढून मगच धुवायला टाकावेत. 
२. लोकरीचे उबदार कपडे शक्यतो वॉशिंग मशीनमध्ये न धुता हातानेच धुवा. 
३. उबदार लोकरीचे कपडे धुताना सौम्य डिटर्जंट किंवा साबणाचा वापर करावा. 
४. जर लोकरीचे कपडे तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये धूत असाल तर त्यात एकाचवेळी जास्त कपडे धुवायला टाकू नका, म्हणजे कपड्यांमध्ये आपापसांत घर्षण होणार नाही. परिणामी, घर्षण न होता लोकरीचे कपडे अगदी स्वच्छ धुतले जातात. 
५. लोकरीचे कपडे धुतल्यानंतर ते वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये किंवा थेट सूर्यप्रकाशात न सुकवता मोकळ्या हवेत सुकवावेत.

Web Title: Do You Also Get Balls On Your Woolen Clothes Then Follow These Tips How to Remove Lint ​How to remove lint from woolen clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.