Join us  

My body, I don't like it... जाड झालात म्हणून स्वत:च्याच शरीराची लाज वाटतेय? समीरा रेड्डी म्हणते....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 1:02 PM

Fitness tips: वजन कमी करण्यासाठी, सुटलेलं पोट आणि ओघळणारे दंड लपविण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असाल, तर थोडा वेळ काढा आणि अभिनेत्री समीरा रेड्डीचा (Sameera Reddy) हा व्हिडिओ एकदा बघाच...

ठळक मुद्देसमीराचा हा व्हिडिओ खरोखरंच प्रेरणादायी ठरणारा किंवा स्वत:कडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देणारा आहे..

आपलं शरीर प्रमाणबद्ध, बांधेसुद असणं, वजन फार वाढू न देणं... हे सगळं योग्यच आहे.. फिटनेस जपण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्याच असतात.. पण प्रत्येकाची शरीरयष्टी वेगवेगळी असते.. आपल्याकडे म्हणतातच ना की कुणाकुणाचं शरीर असं असतं की जे हवा खाऊनही टूमटुमीतच दिसतं.. तर कुणाची प्रकृती अशी असते की अगदी तुपातली पोळी जरी रोज दिली तरी वजन काही वाढत नाही.... त्यामुळेच जसं आहे तसं स्वत:ला स्वीकारा ना.. असं सांगणारा अभिनेत्री समीरा रेड्डीचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे..

 

समीरा सोशल मिडियावरून नेहमीच अनेक वास्तववादी गोष्टी तिच्या चाहत्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असते.. तुमच्या- आमच्या सर्वसामान्यांच्या मनात जे विचार येतात, तेच विचार ती व्यक्त करते, त्यामुळे तिचं बोलणं लगेचच तिच्या चाहत्यांना अपील होतं.. समीराने तिच्या इन्स्टाग्रमावरून नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्यासोबत तिची गोड मुलगी नायराही आहे.. ''Belly Jiggle🙋🏻‍♀️Arm Wiggle! I don’t like it?..no I love it....'' असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे..

 

या व्हिडिओमध्ये समीरा असं सांगण्याचा प्रयत्न करते आहे की सुटलेलं पोट, दंडावर वाढलेली चरबी हे सगळं मला आवडत नाही असं वाटतं का.... तर नाही.. I love it असं म्हणतं तिनं स्वतत:ला, स्वत:च्या शरीराला आहे तसं स्वीकारलं आहे.. ज्या मैत्रिणी जाड असतात, त्यांच्या मनात विनाकारण स्वत:च्या जाडीविषयी कॉम्प्लेक्स असतो.. मग या कॉम्प्लेक्समधूनच त्या वजन घटविण्यासाठी अक्षरश: काहीही करायला तयार असतात.. अशा सगळ्या मैत्रिणींसाठी समीराचा हा व्हिडिओ खरोखरंच प्रेरणादायी ठरणारा किंवा स्वत:कडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देणारा आहे..

 

समीराच्या या व्हिडिओला आलेल्या कमेंटही अतिशय बोलक्या आहेत. भारतात अजूनही तरूण, अविवाहित मुलींना असा सल्ला दिला जातो की वजन जरा कंट्रोलमध्ये ठेव, खाताना- पिताना जरा जपून.. कारण तु जाड झालीस तर लग्न ठरायला अडचण येईल... हे अगदी किशोरवयापासून मुलींच्या डोक्यात ठासून ठासून भरलं जातं.... इथूनच तर सुरुवात होते, मुलींच्या मनात स्वत:च्या वजनाविषयी कॉम्प्लेक्स निर्माण करण्याची. त्यामुळे अशा पालकांनाही समीराने काहीतरी समजावून सांगावं, अशा आशयाची कमेंट तिला तिच्या एका चाहत्याकडून आली आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियासमीरा रेड्डीसेलिब्रिटीवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स