Join us  

कधी विचार केला रेस्टॉरंटमधल्या प्लेट्स, वाट्या नेहमी पांढऱ्या रंगाच्याच का असतात? बघा खास कारण....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 9:11 AM

Social Viral: तुम्हाला काय वाटतं रेस्टॉरंटमधली सगळी कटलरी नेहमी पांढऱ्या रंगाचीच का असते? (why most of the restaurants and hotels use white plates for serving food?)

ठळक मुद्देजेव्हा एखादा पदार्थ आपल्यासमोर येतो, तेव्हा त्याचा आस्वाद जिभेने घेण्याआधी आपण डोळ्यांनी घेत असतो. जो पदार्थ डोळ्यांना खूप छान दिसतो, तो पदार्थ आपल्याला पटकन खावासा वाटतो.

एखादी गोष्ट आपल्या एवढी डोक्यात बसलेली असते की ती तशी का आहे, हा विचारही आपल्या डोक्यात येत नाही. आता उदाहरणच द्यायचं झालं तर रेस्टॉरंटमधल्या प्लेट्स, वाट्या असं सगळं डोळ्यांसमोर आणा.. काही अपवाद सोडले तर तुम्हाला असं लक्षात येईल की बहुतांश रेस्टॉरंटमधली भांडी ही पांढऱ्या रंगाचीच आहेत. त्यातल्या त्यात तुम्ही ज्या महागड्या रेस्टॉरंट्समध्ये गेला आहात, तिथल्या सर्व्हिंग प्लेट्स, बाऊल आठवून पाहा. त्यांचा रंग नक्कीच पांढरा असेल.. असं का असतं बरं, वाचा त्याचंच हे खास उत्तर...(why most of the restaurants and hotels use white plates for serving food?)

 

रेस्टॉरंटमधल्या प्लेट्स, वाट्या पांढऱ्या रंगाच्याच का असतात?

१. आपण सगळ्यांनीच हे ऐकलं आहे आणि अनुभवलं सुद्धा आहे की जेव्हा एखादा पदार्थ आपल्यासमोर येतो, तेव्हा त्याचा आस्वाद जिभेने घेण्याआधी आपण डोळ्यांनी घेत असतो. जो पदार्थ डोळ्यांना खूप छान दिसतो, तो पदार्थ आपल्याला पटकन खावासा वाटतो.

मुलांना भयंकर राग येतो- आदळआपट करतात? बघा मुलांना सतत राग येण्याची कारणं आणि ४ उपाय

म्हणजेच खवय्यांना खाण्याकडे अधिक आकर्षित करण्यासाठी तो पदार्थ अधिक छान, उठावदार पद्धतीने सर्व्ह झाला पाहिजे. काही अभ्यास असं सांगतात की जेव्हा एखादा पदार्थ आपण पांढरा पृष्ठभाग असणाऱ्या प्लेटवर ठेवतो, तेव्हा तो पदार्थ अधिक उठून दिसतो. इतर कोणत्याही रंगापेक्षा पांढऱ्या रंगावर त्या पदार्थाचे मुळ रंग अधिक स्पष्ट दिसून येतात. त्यामुळे खवय्यांना आकर्षित करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या प्लेट्स, वाट्या  वापरलया जातात. 

 

२. याबाबत दुसरं कारण असंही सांगितलं जातं की जेव्हा एखादा पदार्थ पांढऱ्या रंगाच्या प्लेटमध्ये सर्व्ह केला जातो, तेव्हा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तो पदार्थच अधिक उठून दिसत असल्याने खाणाऱ्याचे संपूर्ण लक्ष त्या पदार्थावर, जेवणावर केंद्रित होते आणि तो शांत मनाने पदार्थांचा आस्वाद घेत घेत त्याचं जेवण संपवतो. 

मस्त देसी जुगाड! पुरण, डाळ कुकरमध्ये शिजवताना शिट्टी होताच पाणी बाहेर येतं? करा 'ही' ट्रिक...

३. शिवाय पांढऱ्या रंगाच्या चकचकीत प्लेट्समुळे त्या रेस्टॉरंटची स्वच्छता, टापटीपपणा खवय्यांच्या लगेचच लक्षात येतो. या कारणांमुळे रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना सर्व्ह करण्यासाठी पांढऱ्या रंगाचीच भांडी वापरली जात असावीत, असा अंदाज बांधण्यात येतो.  

टॅग्स :सोशल व्हायरलअन्न