अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. पोस्ट अगदी साधी पण खूपच मजेशीर आहे. तिने जे काही लिहिलं आहे, ते वाचताना हे लक्षात येतं की आपणही किंवा आपल्यापैकी अनेक जणं फोटो काढताना कळतनकळत असंच तर करतात. स्वत:च्या चेहऱ्याची एक बाजू आपल्याला आवडत असते आणि दुसरी बाजू तेवढी आवडत नाही (Do you like one profile less than the other?). त्यामुळे फोटो आणि विशेषत: सेल्फी काढताना आपण नेहमी आवडणारी बाजू फोटोत येईल, अशा पद्धतीने उभे राहतो. विद्या बालनही असंच करायची, त्याचीच तर खास गोष्ट तिने शेअर केली आहे. (Vidya Balan's instagram post)
एक किस्सा सांगताना विद्या म्हणते की तिच्यासोबत फोटो काढायला तिची एक चाहती आली. गर्दी खूपच होती. तिने फोटो काढला आणि ती निघून गेली.
'पैर टुटा है, हिंमत नही...', बघा पाय फ्रॅक्चर असूनही शिल्पा शेट्टी करतेय योगा, म्हणतेय.....
पण नंतर पुन्हा काही मिनिटांतच परत आली आणि आणखी एक फोटो काढू द्या म्हणून विनंती करू लागली. ते पाहून विद्याचे मॅनेजर म्हणाले की आताच तर काढलास फोटो, आता पुन्हा का? तर त्यावर ती चाहती म्हणाली की त्या फोटोत माझ्या चेहऱ्याची जी बाजू दिसतेय, ती मला आवडत नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूने एकदा फोटो काढू द्या. ती हट्टालाच पेटली होती..
या प्रसंगावरून विद्याही विचार करू लागली की आपणही असेच तर होतो. विद्याला म्हणे तिच्या चेहऱ्याची डावी बाजू आवडते आणि उजवी बाजू अजिबात आवडत नाही.
मलायकाचं स्ट्रेचिंग वर्कआऊट, १ व्यायाम आणि ३ जबरदस्त फायदे, करून बघा
कुणी उजवीकडून तिचे फोटो घेतले तर ते अजिबात चांगले येत नाहीत, असं तिला वाटायचं. त्यामुळे शुटिंग करतानाही कॅमेरा जास्तीतजास्त डाव्या बाजूलाच असावा, असं तिनं कॅमेरामनलाही स्पष्टपणे सांगून ठेवलं होतं. पण कालांतराने मात्र तिने तिच्या चेहऱ्याच्या दोन्ही बाजू म्हणजेच साईड प्रोफाईल स्विकारल्या. ती म्हणते की माझा साईड प्रोफाईल तर बदलणार नाही, मग मीच माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन का बदलू नये? स्वत:च्या या अनुभवावरूनच तर विद्या तिच्या चाहत्यांनाही विचारतेय की तुम्हालाही चेहऱ्याच्या एकाच बाजूने, साइड प्रोफाइल फोटो काढायला आवडतं का? यावर तुमचं काय उत्तर आहे?