Lokmat Sakhi >Social Viral > आईपण निभावताय, पण बाईपणाचं काय?.. महिला का करत नाहीत मानसिक स्वास्थ्याचा विचार?

आईपण निभावताय, पण बाईपणाचं काय?.. महिला का करत नाहीत मानसिक स्वास्थ्याचा विचार?

Do You Love Yourself ? Women Should Focus On Mental Health : महिलांनी स्वतःसाठी वेळ काढायला शिका. मानसिक संतुलनासाठी गरजेचे असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 13:35 IST2025-02-19T13:34:09+5:302025-02-19T13:35:08+5:30

Do You Love Yourself ? Women Should Focus On Mental Health : महिलांनी स्वतःसाठी वेळ काढायला शिका. मानसिक संतुलनासाठी गरजेचे असते.

Do You Love Yourself ? Women Should Focus On Mental Health | आईपण निभावताय, पण बाईपणाचं काय?.. महिला का करत नाहीत मानसिक स्वास्थ्याचा विचार?

आईपण निभावताय, पण बाईपणाचं काय?.. महिला का करत नाहीत मानसिक स्वास्थ्याचा विचार?

आईला विचारलं तुला खायला काय आवडतं गं? ती म्हणते तुला जे आवडतं, तेच मला आवडतं. ताईच्या ताटात वाढली गेलेली जास्तीची मॅगी  ती पटकन आपल्या ताटात वाढते. (Do You Love Yourself ?  Women Should Focus On Mental Health )आजी तिची आवडीची साडी आपल्याला ड्रेस शिवण्यासाठी म्हणून फाडायला देऊन टाकते. हे त्यांच प्रेम आहे, यात काही वाद नाही. पण मग या प्रकारात त्यांच्या मनाचं काय? त्यांना खरंच स्वत:साठी काही करायची इच्छा नसते का? तर तसं नाही.. प्रत्येक माणसाला स्वत:च्या आवडी निवडी असतात. इतरांसाठी घरातील स्त्री मन मारून जगते. (Do You Love Yourself ?  Women Should Focus On Mental Health )हे आपण अनेक पुस्तकांमध्ये वाचले आहे. वास्तववादी चित्रपटांमध्ये पाहीलेही आहे. याचं मुख्य कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर महिला स्वत:वर प्रेम करायला विसरून जातात. 

दुसर्‍यांसाठी जगताना स्वत:साठी जगणं राहूनच जातं. तरुणपणी माहेरच्यांसाठी, लग्नानंतर सासरच्यांसाठी, आई झाल्यावर मातृत्वासाठी, त्यानंतर नातवंडांसाठी त्याग करण्यात त्यांना आनंद मिळतो. (Do You Love Yourself ?  Women Should Focus On Mental Health )पण महिलांनी स्वत:वर प्रेम करायला शिकायला हवं. निसर्गानेच महिलांमध्ये ममता, वात्सल्य भरलेले आहे. त्यामुळे कुटुंबियांसाठी काहीही त्याग करताना त्यांना वाईट वाटत नाही. फार लहान गोष्टी असतात. पण त्याचा मनावर परिणाम मोठा होऊ शकतो. आनंदी राहण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे. त्यामुळे महिलांनी पुन्हा स्वत:वर प्रेम करायला सुरवात करा. तुमच्या आवडीचे पदार्थ घरी तयार करण्यापासून सुरूवात करू शकता. फार शुल्लक गोष्ट आहे. पण फायदेशीर ठरेल.

प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. तुमचा छंद जोपासायला सुरवात करा. मन रमवा. तुम्हाला आवडणार्‍या गोष्टी करा. लोक काय म्हणतील? याचा विचार करू नका. जेवढं प्रेम पाल्ल्यावर करता, तेवढंच स्वत:वरही करा. काही महिन्यांतून एकदा फिरायला जा. घरच्या कामातून ऑफिसच्या कामातून स्वत:ला आराम द्या. एका आईला मुलाच्या आवडी पुढे स्वत:ची आवड ठेवणं जमणार नाही. पण स्वत:ची पर्सनल लाइफ सोडूनच देणं गरचं नाही. कित्येक महिला डिप्रेशनचा तसेच एन्झायटीचा शिकार असतात आणि त्यांना ते माहितीही नसते. यातूनच पुढे गंभीर आजार होतात. म्हणून स्वत:मधील हरवलेली 'ती' पुन्हा शोधा. स्वत:वर प्रेम करा. मानसिक आरोग्य मस्त राहील.         

Web Title: Do You Love Yourself ? Women Should Focus On Mental Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.