Lokmat Sakhi >Social Viral > काळपट तवा घासताना हात दुखतात? लिंबाचा 'असा ' वापर करा, कळकट भांडी - तवा होईल स्वच्छ

काळपट तवा घासताना हात दुखतात? लिंबाचा 'असा ' वापर करा, कळकट भांडी - तवा होईल स्वच्छ

Use Lemon for Scrubbing Black Pan काळपट तव्याला पुन्हा नवी चमक देण्यासाठी, लिंबाचा वापर करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2023 05:54 PM2023-01-18T17:54:54+5:302023-01-18T17:55:50+5:30

Use Lemon for Scrubbing Black Pan काळपट तव्याला पुन्हा नवी चमक देण्यासाठी, लिंबाचा वापर करून पाहा..

Do your hands hurt while scrubbing the black pan? Use lemon 'as', hot pots - the pan will be clean | काळपट तवा घासताना हात दुखतात? लिंबाचा 'असा ' वापर करा, कळकट भांडी - तवा होईल स्वच्छ

काळपट तवा घासताना हात दुखतात? लिंबाचा 'असा ' वापर करा, कळकट भांडी - तवा होईल स्वच्छ

भांड्यांशिवाय किचनला शोभा नाही, किचनमधील भांडी चकाचक ठेवण्यासाठी महिला वर्ग विविध उपाय करून पाहतात. भांड्यांमध्ये आपण विविध पदार्थ बनवतो. त्यातील काही पदार्थ करपतात त्यामुळे भांडी देखील चिकट आणि काळपट पडतात. त्याहून जास्त तवा काळपट पडतो. लोखंडी तव्यावर आपण चपाती आणि भाकरी बनवतो. त्याला नियमित चकाचक घासण्यासाठी कित्येक महिलांकडे वेळ नसतो. तवा काळपट पडल्यावर त्याला घासणे कठीण जाते. आठवड्यातून एकदा जर तुम्ही तवा घासायला जात असाल तर, त्यातील काळपटपणा लवकर निघणार नाही. यासाठी लिंबाचा वापर करून पाहा. तव्यातील काळपटपणा निघून जाईल.

लिंबू आणि मीठ

काळपट पडलेला तवा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा वापर करा. यासाठी लिंबू, मीठ आणि गरम पाण्याची आवश्यकता आहे. सर्वप्रथम, तवा कागदाच्या सहाय्याने साफ करून घ्या. त्यानंतर मीठ तव्यावर पसरवून घाला. मीठ टाकल्यानंतर १० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर लिंबूचे दोन काप करा. त्या कापाने तवा चांगले घासून काढा. तवा घासल्यावर गरम पाण्याने धुवा. शेवटी नेहमीच्या डिशवॉशनं तवा चांगले घासून काढा. याने तवा पूर्वीसारखा चमकेल.

लिंबू आणि बेकिंग सोडा

लिंबू आणि बेकिंग सोडाच्या मदतीने आपण तवा घासून काढू शकता. यासाठी १ लिंबू, १ चमचा बेकिंग सोडा आणि गरम पाणी घ्या. एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि गरम पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट नंतर तव्यावर लावून १५ मिनिटं ठेवा.  नंतर लिंबाने तवा घासून गरम पाण्यानं धुवा. याने तवा झटक्यात स्वच्छ होतो.

Web Title: Do your hands hurt while scrubbing the black pan? Use lemon 'as', hot pots - the pan will be clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.