साऊथ क्विन अभिनेत्री सामंथा प्रभू आणि तिचे वैद्यकीय नॉलेज यामुळे ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. सामंथा नेहमीच तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. यावेळी मात्र अनेकजण तिला ट्रोल करत आहेत. सामंथाला ऑटो इम्युन कंडिशन (मायोसिटिस) हा आजार झाला आहे. हा एक त्वचेचा आजार असून या आजारात इतर अनेक समस्यांसोबतच स्नायू दुखतात. या आजाराबाबतचा तिचा अनुभव ती सतत सोशल मिडीयावर शेअर करत असते. नुकतेच सामंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तीन पानांची एक पोस्ट शेअर केली आहे. मात्र त्यात तिने जे उपाय सुचवले त्यामुळे तिला एका डाॅक्टरांनी ट्रोल करत सुनावले की ज्यातलं कळत नाही त्याविषयी काहीबाही शेअर करु नका(‘Liver Doc’ reacts to Samantha Ruth Prabhu calling him out after he slammed her nebuliser post).
सामंथाने एक पोस्ट शेअर करत व्हायरल इंन्फेक्शन्सवर उपचार घेण्यासाठी हायड्रोजन पेरोक्साइड नेब्युलायझर वापरण्याचा सल्ला दिला होता. आपण स्वतःही ते वापरत असल्याचे तिने सांगितले होते. परंतु एका डॉक्टरांनी तिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत सांगितलं की सामंथा वापरत असलेल्या या उपायाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यांनी सामंथाला आरोग्य आणि विज्ञान विषयात तुम्ही अडाणी आहात असंही सुनावलं(Samantha Ruth Prabhu vs A Doctor Who Said She "Should Be Thrown In Prison").
त्यावर सामंथानंही उत्तर दिलं की, गेल्या काही वर्षांमध्ये मला अनेक प्रकारची औषधं घ्यावी लागली आहेत. मला जे काही करण्याचा सल्ला दिला गेला होतात्या सर्व गोष्टी मी आजमावून पाहिल्या आहेत. यापैकी बरेच उपचार महागडे होते. मी किती भाग्यवान आहे की मी ते उपचार घेऊ शकले. त्यामुळे मी औषधांवर खूप रिसर्च केला आहे. अनेक गोष्टी वापरुन पाहिल्या आहेत, औषधांवर खूप खर्च केला आहे. उगाच कोणतेही औषध सुचवायला मी मूर्ख नाही, मी ते स्वतः वापरलं होतं म्हणून मी फक्त चांगल्या हेतूने ते सुचवलं होत.
एका डॉक्टरांनी माझी पोस्ट आणि हेतू यावर शंका घेत मला खूप वाईट शब्दांत सुनावलं आहे. ते डॉक्टर आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे याबद्दल मला शंका नाही. त्यांचा हेतूही चांगला असेल. पण, ज्या पद्धतीनं ते माझ्याशी बोलले, ते बोलणं जरा सौम्य किंवा योग्य शब्दात असतं, तर बरं झालं असतं. या सगळ्यात आता त्यांनी मला तुरुंगात टाकायला हवं. हा वाद सध्या बराच चर्चेत आहे.