पोट दुखण्याचं एक भयंकर कारण मुझफ्फरनगरमध्ये समोर आले आहे. येथील कारवाईदरम्यान तरुणाच्या पोटातून ६३ स्टीलचे चमचे बाहेर आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टीलचे चमचे बाहेर येत असल्याचे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. शामली येथील व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाला बळजबरीने चमचे खायला दिल्याची बाब रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार मुझफ्फरनगरमध्ये उघडकीस आला आहे, ज्यामध्ये ही घटना ऐकणारे प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहे. (Doctor found five dozen spoons from patient stomach in muzaffarnagar)
शहरातील भोपा रोडवर असलेल्या एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून एक-दोन नव्हे तर ६३ स्टीलचे चमचे काढले आहेत. ऑपरेशननंतर रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बोपाडा गावात राहणारा 35 वर्षीय विजय चौहान याला ड्रग्जचे व्यसन होते, त्यामुळे विजयच्या नातेवाईकांनी त्याला शामली येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. असे सांगितले जात आहे की विजय सुमारे एक महिना व्यसनमुक्ती केंद्रात होता, तेथे त्याची प्रकृती खालावली आणि त्याला मुझफ्फरनगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
पुरूषांचा स्पर्म काऊंट वाढवतात ५ पदार्थ; चांगल्या सेक्शुअल लाईफसाठी तज्ज्ञ सांगतात..
डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली त्यावेळी त्याच्या पोटातून ६३ स्टीलचे चमचे बाहेर आल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली, कारण त्यांनीही हे पहिल्यांदाच पाहिलं होतं. रुग्णाचे नातेवाईक अखिल कुमार यांनी सांगितले की, व्यसनमुक्ती केंद्रात त्याला चमचे जबरदस्ती देण्यात आले होते. हा खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार असून अधिक चौकशी सुरू असल्याचं मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.महावीर सिंह यांनी सांगितले.
जिने चढताना, धावताना खूप दम लागतो? खा ५ पदार्थ, स्टॅमिना वाढेल, ठणठणीत राहाल
त्याचवेळी एएनआय या वृत्तसंस्थेनुसार डॉ राकेश खुराना यांनी शस्त्रक्रिया करून तरुणाच्या पोटातील चमचा काढला आहे. डॉक्टर राकेश खुराना यांनी एजन्सीला सांगितले की, ऑपरेशन सुमारे दोन तास चालले आणि सध्या तो तरुण आयसीयूमध्ये दाखल आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तरुणाला विचारण्यात आले की त्याने ते चमचे खाल्ले आहेत का आणि त्याने होकार दिला. हा रुग्ण तरुण वर्षभर चमच्याने खात होता