Lokmat Sakhi >Social Viral > डोळे दुखत होते म्हणून दवाखान्यात गेली; डॉक्टरांनी डोळ्यातून काढल्या तब्बल २३ लेन्स, शॉकिंग व्हिडिओ

डोळे दुखत होते म्हणून दवाखान्यात गेली; डॉक्टरांनी डोळ्यातून काढल्या तब्बल २३ लेन्स, शॉकिंग व्हिडिओ

Doctor Removing 23 Contact Lenses : डॉ. कुर्तिएवाने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, एक दुर्मिळ घटना, जेव्हा एखादी व्यक्ती अनेक रात्री कॉन्टॅक्ट लेन्स काढण्यास विसरते आणि दररोज सकाळी नवीन लावते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 01:51 PM2022-10-14T13:51:57+5:302022-10-14T19:19:41+5:30

Doctor Removing 23 Contact Lenses : डॉ. कुर्तिएवाने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, एक दुर्मिळ घटना, जेव्हा एखादी व्यक्ती अनेक रात्री कॉन्टॅक्ट लेन्स काढण्यास विसरते आणि दररोज सकाळी नवीन लावते

Doctor removing 23 contact lenses from woman eye who forgot to take them off shocking video viral | डोळे दुखत होते म्हणून दवाखान्यात गेली; डॉक्टरांनी डोळ्यातून काढल्या तब्बल २३ लेन्स, शॉकिंग व्हिडिओ

डोळे दुखत होते म्हणून दवाखान्यात गेली; डॉक्टरांनी डोळ्यातून काढल्या तब्बल २३ लेन्स, शॉकिंग व्हिडिओ

डोळे दुखत होते  म्हणून एक महिला डॉक्टरकडे गेली तेव्हा तिला समजले की तिच्या डोळ्यात अनेक कॉन्टॅक्ट लेन्स जमा झाल्या आहेत. कारण ती महिला सलग २३ रात्री रोज रात्री झोपण्यापूर्वी तिची कॉन्टॅक्ट लेन्स काढायला विसरायची. वास्तविक, ही घटना अमेरिकेतील एका रुग्णालयातील आहे. इथल्या एका महिलेच्या डोळ्यात काही प्रॉब्लेम होता म्हणून तिने डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स घालायला सुरुवात केली. (Doctor removing 23 contact lenses from woman eye) एके दिवशी ती कॉन्टॅक्ट लेन्स काढायला विसरली त्यानंतर नवीन कॉन्टॅक्ट लेन्स विकत घेतल्या आणि परिधान केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेसोबत अनेक दिवस हा प्रकार घडला आणि प्रत्येक वेळी ती नवीन कॉन्टॅक्ट लेन्स खरेदी करत असे. (Doctor removing 23 contact lenses from woman eye who forgot to take them off shocking video viral)

त्या कॉन्टॅक्ट लेन्स काढण्याच्या प्रक्रियेचा आता व्हायरल झालेला व्हिडिओ डॉ. कॅटरिना कुर्तिएवा नावाच्या डॉक्टरने 13 सप्टेंबर रोजी तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये ती महिला तिच्या डोळ्यांमधून सर्व 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढताना दिसत आहे. व्हिडिओवरील कॅप्शन असे आहे की, "एखाद्याच्या डोळ्यातून 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढून टाकणे. माझ्या क्लिनिकमधील वास्तविक जीवनातील व्हिडिओ. तुमच्या कॉन्टॅक्ट लेन्ससह कधीच झोपू नका."

तिची पोस्ट शेअर करताना,  डॉ. कुर्तिएवाने लिहिले, "एक दुर्मिळ घटना जेव्हा एखादी व्यक्ती दररोज अनेक रात्री कॉन्टॅक्ट लेन्स काढण्यास विसरते आणि दररोज सकाळी नवीन लावते. सलग 23 दिवस!!! मला काल माझ्या क्लिनिकमध्ये लेन्सचा ढीग पाहायला मिळाला." ऑनलाइन शेअर केल्यापासून, व्हिडिओ 2.9 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि 81 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक यूजर्सनी धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

परदेशी गेलेल्या लेकाला वाढदिवसाच्यावेळी अचानक पाहून वडील भावूक, बापलेकाचं प्रेम पाहून डोळे पाणावतील

महिलेबद्दल काळजी करत एका यूजरने लिहिले की, 'मी या महिलेला चष्मा घालण्याचा सल्ला देईन,' दुसर्‍या पोस्टमध्ये प्रक्रियेची छायाचित्रे शेअर करताना डॉक्टरांनी पुढे लिहिले, 'मी सर्व कॉन्टॅक्ट लेन्स काळजीपूर्वक वेगळे केले आहेत आणि ते एकूण 23 आहेत . मला कॉन्टॅक्ट लेन्स वेगळे करण्यासाठी एक आश्चर्यकारक शस्त्रक्रिया उपकरण वापरावे लागले.'

Web Title: Doctor removing 23 contact lenses from woman eye who forgot to take them off shocking video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.