Join us  

शाबास! असे भारी डॉक्टर की इंजेक्शन दिलं तरी कळलं नाही, आणि कळल्यावर... पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2022 1:41 PM

Doctor Viral Video of Giving Vaccine to Baby : इंजेक्शन त्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे असले तरी त्या चिमुकल्या जीवाला ते टोचताना आपलाच जीव कसानुसा होतो.

ठळक मुद्देहा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की १३ लाखांहून अधिक जणांनी आतापर्यंत लाईक केला आहे. लहान मुलांच्या डॉक्टरांकडे त्यांना हाताळण्याचे सकसब असणे महत्त्वाचे असते हेच खरे

लहान मुलांना बरं नसलं की सगळ्या घरातलं वातावरण उदास होऊन जातं. इतकंच नाही तर मुलांना खाऊ घालणं, त्यांना औषधं देणं आणि प्रसंगी डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन देणं ही तारेवरची कसरत असते. इतक्या लहान लेकरांना आजारी पडल्यावर किंवा लसीकरण म्हणून डॉक्टर इंजेक्शन टोचतात तेव्हा अनेकदा आईच्याच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. हे इंजेक्शन त्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे असले तरी त्या चिमुकल्या जीवाला ते टोचताना आपलाच जीव कसानुसा होतो. पण इंजेक्शन दिलेले बाळाला कळू नये आणि ते रडू नये यासाठी डॉक्टरांचे स्कील अतिशय महत्त्वाचे असते (Doctor Viral Video of Giving Vaccine to Baby).  

(Image : Google)

हसत-खेळत बाळाला कळणारही नाही असे इंजेक्शन दिले तर बाळाला कळतही नाही आणि ते फारसे रडतही नाही. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक डॉक्टर बाळाला तपासताना दिसतात. इतकेच नाही तर हे डॉक्टर बाळाशी छान गप्पाही मारतात. बाळही त्यांच्या बोलण्याला छान प्रतिसाद देताना व्हिडिओमध्ये दिसते. बाळाची आई बाजूलाच उभी असलेली दिसते. आधी हे डॉक्टर बाळाला तपासतात आणि मग काही कळायच्या आतच हळूच इंजेक्शनची सुई काढून त्याच्या मांडीला टोचतात. 

इंजेक्शन दिल्यावर बाळाला थोडे नक्कीच टोचले असणार त्यामुळे बाळ थोडे रडायला लागते. पण तेवढ्यात हे डॉक्टर बाजूला असलेले हत्तीचे टॉय घेऊन त्याचे लक्ष विचलित करतात. मग हे बाळही इंजेक्शनचे विसरुन जाते आणि काही क्षणात रडायचे थांबते. इन्स्टाग्रामवर डॉ. सय्यद मुजाहिद हुसैन यांच्या डॉ. हायफाईव्ह या अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की तो लाखो जणांनी तो पाहिला असून १३ लाखांहून अधिक जणांनी आतापर्यंत लाईक केला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.    

टॅग्स :सोशल व्हायरलडॉक्टर