Join us  

Doctors find foetus inside womans liver : बापरे! पोटाऐवजी महिलेच्या लिव्हरमध्ये दिसलं बाळ; अल्ट्रासाउंड रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 4:19 PM

Doctors find foetus inside womans liver : शरीरसंबंध  ठेवल्यानंतर शुक्राणू कसेतरी महिलेच्या यकृतात गेले आणि महिलेच्या यकृतामध्ये भ्रूण वाढू लागला. 

आई होणे ही कोणत्याही स्त्रीसाठी मोठी गोष्ट असते. गर्भधारणेमुळे स्त्रीचे आयुष्यच बदलत नाही, तर तिच्या शरीरातही अनेक बदल होतात. असे असूनही, स्त्री तिच्या गर्भधारणेचा आनंद घेते. जगातील अनेक महिलांना त्यांच्या गरोदरपणात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. असाच एक विचित्र गर्भधारणेचा प्रकार कॅनडातून समोर आला आहे.  येथील एक गर्भवती महिला डॉक्टरकडे आली असता तिच्यासमोर एक विचित्र परिस्थिती समोर आली. (Doctors find foetus inside womans liver )

कॅनडाचे बालरोगतज्ञ डॉ. मायकल यांनी त्यांच्या टिकटॉक अकाउंटवरील व्हिडिओद्वारे या प्रकरणाची माहिती दिली. डॉ. मायकल यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक प्रकारची प्रकरणे पाहिली, परंतु अशी केस कधीच पाहिली नाही. डॉक्टर मायकल यांच्याकडे एक 33 वर्षीय महिला उपचारासाठी आली होती. महिलेची मासिक पाळी 14 दिवस चालली असून गेल्या दीड महिन्यापासून तिला मासिक पाळी येत नव्हती. यामुळे ती गर्भधारणेची खात्री करण्यासाठी डॉक्टरांकडे आली होती.

तिला गर्भवती असल्याची डॉक्टरांनाही खात्री होती. याची खात्री करण्यासाठी डॉक्टरांनी महिलेचे अल्ट्रासाऊंड केले. या अल्ट्रासाऊंडच्या अहवालाने डॉक्टरांसह महिलेलाही आश्चर्याचा धक्का बसला. खरं तर ती महिला गरोदर होती पण मूल तिच्या गर्भाशयात नव्हते. शरीरसंबंध  ठेवल्यानंतर शुक्राणू कसेतरी महिलेच्या यकृतात गेले आणि महिलेच्या यकृतामध्ये भ्रूण वाढू लागला. 

काय हा विचित्र प्रयोग! भावानं पहिल्यांदाच टेस्ट केली मिरिंडा पाणीपुरी; पाहा त्याची भन्नाट रिएक्शन

डॉक्टरांनी सांगितले की, महिलेच्या यकृतामध्ये एक्टोपिक गर्भधारणा आढळून आली आहे. एक्टोपिक गर्भधारणा तेव्हा होते जेव्हा अंडी फॅलोपियन ट्यूबमध्ये चुकीच्या दिशेने प्रवास करू लागतात आणि यामुळे गर्भधारणा योग्यरित्या होत नाही. हे पोटात अनेकदा दिसते पण यकृताच्या आत हे पहिल्यांदाच दिसले. 

संबंधानंतर गर्भधारणेच्या भितीनं 'त्या' गोळ्या घेण्याचा फायदा की तोटा? तज्ज्ञ सांगतात की... 

हा प्रकार पाहताच डॉक्टरांनी महिलेवर शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा जीव वाचला मात्र यकृताच्या आत गर्भाचा आधीच मृत झाला होता. अशा स्थितीत डॉक्टरांनी यकृतातून मृत गर्भ बाहेर काढला. जर आपण इतिहासाबद्दल बोललो तर, जर्नल ऑफ इमर्जन्सीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 2012 मध्ये, एका महिलेच्या यकृताशी 18 आठवड्यांचा गर्भ जोडलेला आढळला होता. त्यावेळी महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यादरम्यान रक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :सोशल व्हायरलमहिलास्त्रियांचे आरोग्यसोशल मीडिया