Join us  

बापरे! ६ वर्षांच्या चिमुरडीच्या पोटात सापडला दीड किलो केसांचा गुच्छ; डॉक्टरांनी स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 12:50 PM

Doctors remove huge hairball from 6 year old girl's stomach :

(Image Credit- The Mirror)

केस आरोग्यासाठी किती नुकसानकारक असतात हे तुम्हाला माहित असेल. जेवणात केस दिसल्यानंतर अनेकांची ते जेवण खाण्याची इच्छाच उरत नाही. स्वयंपाकघरात किंवा कोणतंही काम करत असताना केस दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी लागते. एका लहान मुलीच्या पोटात दीड किलो केसांचा गुच्छ सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ( 6 years old girl stomach operation doctors haryana panchkula)

हरियाणातील पंचकूलामधून ही विचित्र घटना समोर आली असून डॉक्टरांनी ऑपरेशन करून ६ वर्षांच्या मुलीच्या पोटातून जवळपास  दीड किलो केसांचा गुच्छ काढला आहे. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. 

पंचकूलातील मदनपूर या गावातील रहिवासी असलेल्या  ६ वर्षांच्या मुलीला खूप दिवसांपासून पोटदुखीची तक्रार जाणवत होती. वेदना असहय्य झाल्यानं मुलीचे नातेवाईक पंचकूला सेक्टर ६ च्या रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी या चिमुरडीच्या काही चाचण्याही करून घेतल्या. त्यातून समोर आलं की पोटात काहीतरी अडकल्यानं हा त्रास जाणवत आहे. 

जबरदस्त! लग्न मंडपात नववधूची रॉयल एंट्री; पाहा नव्या नवरीचा तुफान व्हायरल व्हिडिओ

सर्जन विवेक भादू आणि त्यांच्या टिमनं या मुलीचे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केले. आता तिची प्रकृती स्थिर असून निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.  ऑपरेशन व्यवस्थित पूर्ण करून मुलीचा जीव वाचवल्याबद्दल मुलीच्या कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया