Join us  

१३०० डॉलर्स कुणी टीप म्हणून देते का? गरोदर वेट्रेसला ' त्यानं' स्वतःहून मदत केली कारण.. व्हायरल इमोशनल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2022 1:54 PM

Social Viral Video निःस्वार्थ मदत करण्याची वृत्ती बऱ्याच कमी लोकांमध्ये दिसून येते. याचाच प्रत्यय देणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

या कलियुगात निःस्वार्थी व्यक्ती देखील आहेत, याचा प्रत्यय आपल्याला क्षणा क्षणाला येत असतो. चांगली माणसे आपल्याला वाटेवर भेटत राहतात. जे आयुष्यभर लक्षात राहील अशी एक गोड आठवण देऊन जातात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका प्रेग्नंट वेट्रेसला एका व्यक्तीने तब्बल १८०० डॉलर दिलेत. होय, ते ही फक्त टीप म्हणून बक्षीस दिलंय. हे दृश्य पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू येणं साहजिकच आहे. परंतु, हा व्हिडिओ पाहून तुमच्या ही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. 

व्हायरल होणारा हा व्हिडिओ न्यू यॉर्क पेनसिल्व्हेनिया येथील एका हॉटेलमधील आहे. ऍशले बॅरेट ही प्रेग्नंट वेट्रेस सुरुवातीला टेबलवर जाऊन जेमी कारमेन या व्यक्तीला "आणखी काही ऑर्डर आहे का सर?" असे विचारते. त्यावर तो नाही म्हणत, "आपल्याला आता पर्यंत कितीपर्यंतची टीप मिळाली आहे ?" असे विचारतो. त्यावर ती १०० डॉलरपर्यंत असे म्हणते. तेवढ्यात जेमी १३०० डॉलर रोख रक्कम काढून देतो. त्यावर ती "मी नाही घेऊ शकत" असे म्हणते, आणि रडू लागते.

ती भावूक झालेली पाहून जेमी तिला मिठीत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करतो. १३०० डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार एक लाखाहून अधिक रुपयांची तिला टीप मिळाली. खरंच ही बाब आश्चर्यकारक आणि भावूक करणारा क्षण म्हणावं लागेल.

हा भावूक करणारा व्हिडिओ अर्णींग टीप या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत जेमीचे कौतुक केले असून, या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलहॉटेलमाध्यमेसोशल मीडिया