मांजरीला किंवा एखाद्या पाळीव कुत्र्याला कडेवर घेऊन जाणे ठिक आहे. पण जंगलात राहणाऱ्या सिंहाला कुणी कडेवर घेतलेलं तुम्ही पाहिलंय का? मग आता हा व्हिडिओ पाहाच. कारण एका डेअरिंगबाज बाईने हे धाडस करुन दाखवले आहे. जंगलचा राज्याची डरकाळी ऐकून भल्याभल्यांची पळता भुई थोडी होते. असे असताना या महिलेकडे इतके धाडस आले तरी कुठून? सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला मध्यरात्री चक्क सिंहाला कडेवर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा व्हिडिओ कैद झाला असून हा व्हिडिओ पाहून आपण थक्क होऊन जातो. जंगली प्राण्यांशी दोस्ती असणे इथपर्यंत ठिक आहे पण त्यांना कडेवर घेऊन अशाप्रकारे मध्यरात्री रस्त्याने चालणे धोकादायक नाही का असा प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला पडल्यावाचून राहत नाही.
My neighbor and her dog seemed to not be getting along last night pic.twitter.com/fUGcpuTkMY
— Arlong (@ramseyboltin) January 3, 2022
ही घटना कुवैतमधील असून एक पाळलेला सिंह घराच्या बाहेर आला होता. त्यानंतर या सिंहाच्या मालकाने सिंह घराबाहेर पडला असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सदर परिसरात या सिंहाचा शोध सुरू झाला. अचानक हा सिंह रस्त्यावर फिरत असताना दिसला आणि याठिकाणी एकच गोंधळ माजला. पण या सगळ्यात एक मुलगी पुढे आली आणि तिने या सिंहाला सरळ आपल्या कडेवर घेतले आणि घरी जाण्यासाठी त्याला गाडीत ठेवले. पोलिस यायच्या आधीच या सिंहाची मालकीण सदर स्थळी पोहोचल्यामुळे पोलिसांचे काम वाचले.
ही मुलगी आणि तिचे वडील या सिंहाचे मालक असल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारे सिंह घरातून बाहेर आल्याची घटना कुवेतमध्ये पहिल्यांदा घडलेली नसून याआधीही असे घडले आहे. अशाप्रकारे जंगली प्राणी पाळणे कायद्याने गुन्हा असला तरीही कुवेतमध्ये सर्रास असे प्राणी पाळले जातात. चित्ता, वाघ, सिंह व इतर भक्षकांना अशाप्रकारे बेकायदेशीरपणे सर्रास पाळले जाते. ट्विटरवर या व्हिडिओला कित्येक लाख व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी त्यावर शॉकींग प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.