भांडी नेहमी चकचकीत स्वच्छ नव्यासारखी दिसावी, असे प्रत्येक गृहिणीला वाटते. भांड्यांमधून बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी, आपण डिशवॉश बारचा वापर करतो. बाजारात अनेक प्रकारचे डिशवॉश बार आणि लिक्विड्स मिळतात. पण अनेकदा डिशवॉश बार लवकर संपतात. भांडी घासत असताना त्यात साहजिक पाणी पडतेच, ज्यामुळे साबण लवकर गळतात.
अशावेळी डिशवॉश बारचा खर्चही वाढतो. अनेक घरात आठवड्याच्या आत एक डिशवॉश बार संपतो. अशा वेळी करायचं काय असा प्रश्न गृहिणींना पडतो? काही वेळेस साबणाचे डाग तसेच भांड्यांवर राहतात. ज्यामुळे आरोग्याला हानी देखील पोहचू शकते. डिशवॉशपेक्षा आपण घरगुती लिक्विड डिशवॉशरचा वापर करू शकता(Does dish soap dissolve and turn muddy? 1 trick).
लिक्विड डिशवॉशर करण्यासाठी लागणारं साहित्य
डिशवॉश बार
व्हिनेगर - दोन चमचे
मीठ - एक चमचा
डिटर्जंट की साबण? कपडे धुण्यासाठी काय वापरणं योग्य? कपडे भुरकट न होता कायम नव्यासारखे हवे तर..
पाणी
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये उरलेले डिशवॉश बारचे तुकडे, किंवा डिशवॉश बारचं पाणी घ्या. त्यात दीड ग्लास पाणी घालून मिक्स करा. साबण पाण्यात मिसळल्यानंतर, त्यात एक चमचा मीठ आणि दोन चमचे व्हिनेगर घाला. सर्वकाही मिक्स केल्यानंतर, ते एका बाटलीत साठवून ठेवा.
पिण्याच्या पाण्याची बॉटल आतून पिवळट झाली? ३ सोप्या टिप्स, न घासता बाटल्या होतील चकाचक
लिक्विड डिशवॉशर वापरण्याची पद्धत
जेव्हा भांडी घासायला घ्याल तेव्हा, एका वाटीमध्ये लिक्विड डिशवॉशर घ्या. त्यात भांडी घासण्याचं स्क्रबर बुडवून, भांडी घासून काढा. स्क्रबरने भांडी घासल्यानंतर, स्वच्छ पाण्याने धुवा आणि सुती कापडाने पुसून टाका.