उन्हाळा सुरु होताच फॅनचा स्पीड वाढवण्यात येते. दिवसभर घरात पंखा चालूच असतो. दिवस रात्र पंखा चालू राहिल्याने फॅनवर धूळ लवकर साचते, शिवाय विजेचे बिलही जास्त येते (Electricity Savings Tips). अनेकांचा असा समज आहे की, पंख्याचा स्पीड कमी ठेवल्याने विजेचे बिल की येते. त्यामुळे अनेक जण ५ च्या ऐवजी ४ नंबरवर फॅन सुरू ठेवतात. परंतु, हे खरं आहे का? यामुळे विज बिल कमी येते की वाढते? की आहे तेवढेच वीजबिल येते?(Does Fan at Low Speed save electricity).
फॅनची स्पीड कमी केल्याने वीजबिलावर फरक पडतो?
फॅनची स्पीड कंट्रोल करण्यासाठी रेग्युलेटर असतो. सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारचे, विविध डिझाईनचे फॅन मिळतात. पण रेग्युलेटर मात्र २ प्रकारचे असतात. एक रेग्युलेटर फॅनच्या स्पीडसोबत त्याच्या इलेक्ट्रिसिटीला कण्ट्रोल करते. म्हणजेच फॅनची स्पीड केल्याने विजेचे बिलही कमी येते. तर, दुसऱ्या रेग्युलेटरमध्ये विजेची बचत होत नाही. यात फॅनची स्पीड वाढवा किंवा कमी करा, विजेचे बिल आहे तितकेच येईल.
तुळस काळी पडते, लगेच वाळते? चमचाभर मिठाचा सोपा उपाय; तुळशीजवळ कीटक फिरकणारही नाही..
इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर
इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर खास आहे. हे रेग्युलेटर विजेचा जास्त वापर करत नाही. शिवाय कण्ट्रोलमध्ये विजेचा वापर करतो. परंतु, या रेग्युलेटरची साइज नॉर्मल रेग्युलेटर पेक्षा जास्त असते. शिवाय हे रेग्युलेटर सर्वसामान्य रेग्युलेटरपेक्षा महाग असते. पण याच्या वापराने विजेची बचत होते आणि वीजबिल कमी येते.
साबुदाण्याची भेळ कधी खाल्ली आहे का? खिचडी आणि वडे खाऊन पित्त होत असेल तर भेळ हा उत्तम पर्याय
इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर नेमके कुठे मिळेल?
इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरला ओपन मार्केटमधून खरेदी करता येवू शकते. जर आपल्याला ओपन मार्केटमध्ये रेग्युलेटर मिळत नसेल तर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सर्च करून आपण हे इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर खरेदी करू शकता. हे इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर अधिक काळ टिकतात, शिवाय विजेचीही बचत होते.