Join us  

घरात मुंग्यांचा सुळसुळाट? टॅलकम पावडरचा करा असा वापर, ५ मिनिटात मुंग्या होतील छूमंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2023 4:08 PM

Does talcum powder keep ants away? घरातून मुंग्यांना पळवून लावण्यासाठी टॅलकम पावडर - हळदीचा करा असा वापर..

एखादा गोड पदार्थ जमिनीवर पडला तर, की क्षणात त्याच्या भोवतीने मुंग्या जमतात. त्यानंतर प्रत्येक कोपऱ्यात मुंग्यांच्या रांगा दिसू लागतात. कालांतराने मुंग्या बिछान्यात आणि कपड्यांवर दिसू लागतात. मुंग्या दोन प्रकारच्या असतात. लाल आणि काळ्या. घरात लाल मुंग्या वाढल्या की, डब्यांच्या भोवतीने फिरू लागतात.

मुंग्यांना पळवून लावण्यासाठी आपण अनेक किटकनाशकांचा वापर करतो. परंतु, हे किटकनाशक आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. अशा वेळी आपण टॅलकम पावडर आणि हळदीचा वापर करू शकता. टॅलकम पावडरचा वापर करून मुंग्यांना पळवून लावायचं कसं हे पाहूयात(Does talcum powder keep ants away?).

मुंग्यांना पळवून लावण्यासाठी तयार करा अशी पावडर

सर्वप्रथम, गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात ३ चमचे टॅलकम पावडर घाला, त्यानंतर त्यात एक चमचा हळद घालून मिक्स करा. चमच्याने हे साहित्य भाजून घ्या, हळद आणि पावडर भाजून घेल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे मुंग्यांना पळवून लावण्याची पावडर तयार.

कपड्यांवर पडलेले गंजाचे डाग निघता - निघत नाही? ४ भन्नाट टिप्स, डाग होतील गायब

अशा पद्धतीने मुंग्यांवर करा पावडरचा वापर

१०१ वर्षांच्या आजीचा भार खांद्यावर वाहत कावड यात्रेला निघालेल्या नातवाची कमाल, २७० किलोमीटर पायी प्रवास

जिथे मुंग्यांची रांग दिसत असेल त्या ठिकाणी मुंग्यांना पळवून लावण्याची पावडर टाका. भाजलेल्या हळदीच्या उग्र गंधामुळे मुंग्या पळून जातील. काही वेळानंतर त्या ठिकाणी मुंग्या दिसणार नाहीत, व तेथील मुंग्या देखील पळून जातील. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया