Lokmat Sakhi >Social Viral > रिमोटने AC बंद केला पण मेन स्विच ऑन असेल तरी लाईट बील वाढतं का? समजून घ्या...

रिमोटने AC बंद केला पण मेन स्विच ऑन असेल तरी लाईट बील वाढतं का? समजून घ्या...

जास्तवेळ एसी लावला नाही तरीसुद्धा बील जास्त येतं अशी अनेकांची तक्रार असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 06:09 PM2023-06-05T18:09:00+5:302023-06-05T18:10:35+5:30

जास्तवेळ एसी लावला नाही तरीसुद्धा बील जास्त येतं अशी अनेकांची तक्रार असते.

Does the light bill increase even if the AC is turned off by the remote but the main switch is on | रिमोटने AC बंद केला पण मेन स्विच ऑन असेल तरी लाईट बील वाढतं का? समजून घ्या...

रिमोटने AC बंद केला पण मेन स्विच ऑन असेल तरी लाईट बील वाढतं का? समजून घ्या...

गरमीच्या दिवसात  शरीरातून घामाच्या धारा वाहत असतात.  अशात गारवा मिळण्यासाठी प्रत्येक घरात एसी,  कुलर चालवला जातो. जास्तवेळ एसी लावला नाही तरीसुद्धा बील जास्त येतं अशी अनेकांची तक्रार असते.  एसीचा वापर कमी केला तरी लाईटबील जास्त का येतं ते समजून घेऊया. जास्तीत जास्त लोक बेडरूमध्ये एसी लावतात कारण रात्री शांत झोपण्यासाठी वातावरण थंड असल्यास मदत होते. (What if you do not switch off ac main switch and off ac only with remote is it take more electricity)

रात्री झोप आपल्यानंतर  गरज नसल्यावर लोक एसी रिमोटनं बंद करतात. अशावेळी झोपेत असताना मेन स्विच बंद करायला लोक कंटाळा करतात.  त्यामुळेच लाईट बील जास्त येतं. एसीच्या पीसीबी बोर्डमध्ये एसी ऑन- ऑफ करणारं रिले स्विच खराब झाल्यानं इंडोर युनिट बंद होतं पण आऊटडोअर युनिट सुरूच राहतं. 

जेव्हा तुम्ही रिमोटनं बटन दाबता तेव्हा एसीची लाईट बंद होते. त्यावेळी अनेकांना असं वाटतं की एसी बंद झाला आहे. पण रिमोटनं बंद केल्यावर लाईट बील येत राहतं. अशावेळी एसीचे रिले स्विच खराब झालं तर आऊटडोअर युनिट नेहमीच सुरू राहील.

आऊटडोअर युनिट बाहेर असल्यामुळे एसी ऑफ  आहे ऑन हे कळून येत नाही आणि लाईटबील वाढत जातं. असा स्थितीत तुम्ही एसीचा कमी वापर केला तरी  २४ तास लाईटबील येतच राहील. लाईट बील जास्त येण्यापासून वाचण्यासाठी मेन लाईन बंद करायला विसरू नका. 

एसी मेन लाईनं बंद करताच त्यातून करंट येणं बंद होईल आणि रिले स्विचमध्ये बिघाड असेल तर आऊटडोर युनिटमध्ये असलेलं कम्प्रेसर काम करणार नाही. कंप्रेसर सतत सरू राहिल्यानं लवकर खराब होऊ शकतं. लाईट बीलसह कंप्रेसर दुरूस्त करण्याचा खर्च वाढू शकतो.  जेव्हा तुम्ही एसी लावला असेल तेव्हा सिलिंग फॅन ऑन ठेवा.

सिलिंग फॅनमुळे खोली हवेशीर राहते आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यात हवा पोहोचते. जेणेकरून तुम्हाला एसीचं तापमान कमी करत राहवं लागणार नाही. कमी वीच खर्च करून जास्त कुलिंग मिळवता येते.  एसी सुरू करण्याआधी खोलीत पंखा सुरू  ठेवा. ज्यामुळे खोलीतील गरम हवा बाहेर पडेल आणि एसी सुरू करता येईल. 

Web Title: Does the light bill increase even if the AC is turned off by the remote but the main switch is on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.