आपल्यापैकी अनेकजणांना घरात प्राणी, पक्षी पाळण्याची आवड असते. हे पाळीव प्राणी आपले चांगले मित्र होतात असे मानले जाते. पाळीव प्राण्यांची काळजी घेतल्याने शरीरातील ताणतणाव कमी होऊ शकतात आणि व्यक्तीला त्यांच्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारची 'सकारात्मक ऊर्जा' मिळते. हे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे. आजकाल जगभरात पाळीव प्राणी पाळणे हा ट्रेंड बनला आहे. अनेक लोक आपल्या छंदासाठी आणि सुरक्षिततेसाठी प्राणी पाळतात. घरी पाळीव प्राणी पाळल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते, त्यामुळे संवाद आणि मानसिक आरोग्य वाढीस लागते.घरात कुत्रा, मांजर किंवा अनेक पाळीव प्राणी हे खेळताना – बागडताना कधीच कोणता विचार न करता मनसोक्त आनंद घेत असतात आणि देतही असतात. त्यांच्या नुसत्या सोबत असण्यानेदेखील आपल्याला कंटाळा किंवा नैराश्य येत नाही. जर माणूस एकटा असेल तर त्याच्या एकटेपणाने नैराश्य येते. परंतु आजूबाजूला कायम आनंद देणारे, खेळणारे हे प्राणी असतील तर आपल्याला बाकी गोष्टींचा विचार करायला वेळ मिळत नाही. कित्येक लोक आपल्या घरातील पाळीव प्राण्यांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेतात. इतकेच नव्हे तर त्यांचे वाढदिवसही मोठ्या धुमधडाक्यात साजरे करतात. माणसाचे प्राण्यांवर जेवढे प्रेम आहे, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रेम आणि निष्ठा प्राण्यांकडून मिळते. आपल्यासोबत राहताना प्राणी आपल्या कुटुंबाचा एक भाग बनतात(Dog Helps Take Care Of Her Sister).
या व्हिडिओत नक्की काय आहे... momo_cocker spaniel या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. इन्स्टाग्राम पेजचे नाव आणि कमेंट्स मधील उल्लेख यावरून त्या कुत्र्याचे नाव मोमो असेल असा अंदाज लावता येऊ शकतो. या व्हिडिओत, आपल्याला आई, मुलगी व त्यांच्या घरातील पाळीव कुत्रा दिसत आहे. मुलं घरात काही ना काही मस्ती करतातच किंवा आईने सांगितलेले ऐकत नाही त्यामुळे त्यांना आईचा ओरडा खावा लागतो. या व्हिडिओतसुद्धा, एक मुलगी खाली बसली आहे आणि तिची आई तिला काही कारणास्तव ओरडत आहे. ती मुलगीसुद्धा गप्प बसून आईच बोलणं ऐकत आहे. आईला राग आल्यामुळे ती आपल्या मुलीला चांगले धपाटेपण देत आहे. हा सगळा प्रकार त्यांच्या घरातील पाळीव कुत्रा बघत आहे. हे बघताच, तो कुत्रा धावत येऊन आई आणि मुलीच्या भांडणात मध्ये पडून समजूत काढत आहे. तसेच त्या मुलीला आईचा मार खाण्यापासून वाचवताना दिसत आहे.
काही निवडक कमेंट्स... या व्हिडिओला नेटिझन्सनी लाईक्स करून भरपूर कमेंट्स दिल्या आहेत. हा व्हिडीओ बघून मला आणि माझ्या वडिलांना रडायला आले, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर काहींनी म्हटले आहे की, हा कुत्रा आपल्या बहिणीचे रक्षण करत आहे. तसेच या मोमोचे त्या मुलीवर किती प्रेम आहे हे दिसून येत आहे. अशा अनेक कमेंट्स करत नेटिझन्स या व्हिडीओला लाईक्स करत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताच लगेच त्याला १९००० व्ह्यूज हजारोंनी लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.