Join us  

खायचं नाही, फिरायला चल म्हणून हट्टीपणा करणाऱ्या भूभूला मालकीणीने कसं समजावलं, व्हिडिओ पाहून म्हणाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 11:19 AM

Dog Insisted on Going Out Like Child Owner Said Eat First Viral Video : कुत्र्याच्या पिल्लाचा गोंडस हट्ट पाहून तुम्हीही त्याच्या प्रेमात पडाल

ठळक मुद्देफ्रूटी हा त्याचा क्रश असून तिला भेटवायचे प्रॉमिस केल्यावरच हा भुभू त्याचा खाऊ खाण्यास तयार झाला. जवळपास ५० हजार जणांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

लहान मुलांना एखादी गोष्ट हवी असली की ती दिल्याशिवाय शांत होत नाहीत. हट्टीपणा करुन त्यांना हवी ती गोष्ट ते आपल्याकडून करुन घेतातच. अनेकदा त्यांचा हट्ट पुरवणे पालकांसाठी अवघड होऊन बसते, कारण एमुक गोष्ट केल्याशिवाय खाणार नाही, तमुक गोष्ट केल्याशिवाय हे करणार नाही अशा अटीही ते पालकांना घालतात. मग कधी प्रेमाने बोलून, कधी रागाने ओरडून, समजावून त्यांना शांत करावे लागते. मात्र काही वेळा या सगळ्या गोष्टी फोल ठरतात आणि आपल्याला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागते. असेच काहीसे आपल्या घरात असणाऱ्या पाळीव प्राण्यांसोबतही असू शकते. (Viral Video) घरात एखादे लहानसे मांजर किंवा कुत्र्याचे पिल्लू असेल तर त्यांचे खाण्यापिण्याचे नखरे, त्यांचे लाड करणे अशा सगळ्या गोष्टी ओघानेच आल्या. प्राणी असले म्हणून काय झाले, त्यांनाही एखाद्या लहान मुलाप्रमाणे जपावे लागते (Dog Insisted on Going Out Like Child Owner Said Eat First). 

सोशल मीडीयावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक महिला आपल्या घरातील कुत्र्याच्या पिल्लाची समजूत काढताना दिसत आहे. या पिल्लाने खाणं खावं म्हणून ती त्याला बऱ्याच गोष्टींची भुरळ घालायचा प्रयत्न करते. रागवू नको मी तुला फिरायला नेईन, आज शनिवार आहे, मग मी तुला फ्रूटीशी भेटवेन असं काही काही समजावते. प्रेमाने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत त्याला लाडाने खाण्याचा आग्रह करताना दिसते. मात्र तरीही हे भुभू मात्र काही केल्या तिचे ऐकत नसल्याचे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते. त्याच्या डीशमध्ये छानसा खाऊ असून ती वारंवार त्याला खा असे म्हणत असतानाही भुभू मात्र इकडे-तिकडे बघून या महिलेकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. हे छोटेसे केसाळ कुत्रे इतके गोंडस आहे की त्याला कोणत्याही गोष्टीवरुन ओरडावेसे वाटणारच नाही. 

इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास ५० हजार जणांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. आपल्याकडील प्राण्यासोबतही असाच प्रॉब्लेम आहे, आई ही शेवटी आई असते मग ती प्राण्याची असो किंवा माणसाची, इतके नखरे करणाऱ्या प्राण्यांना सांभाळणे हा टास्क आहे असे काही ना काही म्हणत नेटीझन्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. Joymishra5 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील हा व्हिडिओ असून तो नेमका कोणत्या शहरातील आहे हे मात्र कळू शकले नाही. या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहीले आहे की या भुभूला मनवण्यासाठी १५ मिनीटे गेली. फ्रूटी हा त्याचा क्रश असून तिला भेटवायचे प्रॉमिस केल्यावरच हा भुभू त्याचा खाऊ खाण्यास तयार झाला. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाकुत्रा