Join us  

मांजरीच्या पिल्लाला वाचविण्यासाठी कुत्र्याची धडपड, पाहा क्यूट व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 4:45 PM

Dog Save Kitten From Water Video Goes Viral : एक कुत्रा मांजराच्या पिल्लाला अतिशय क्यूट पद्धतीने मदत करताना दिसतो.

ठळक मुद्देया व्हिडिओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून प्राणीही एकमेकांना कशी साथ देतात तेच यातून दिसून येते. कुत्रे या मांजराच्या पिल्लासमोरच्या दगडावर अतिशय परफेक्ट रितीने ही फळी ठेवते आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहते.

अनेकदा आपण कोणाची भांडणं सुरू असली की अगदी सहज कुत्र्या-मांजरासारखे भांडतात असा शब्दप्रयोग करतो. कुत्रा आणि मांदर हे एकमेकांशी कायम भांडणारे प्राणी म्हणून ओळखले जातात. एखाद्या घरात हे दोन्ही प्राणी असतील तर मात्र त्यांच्या मालकाचे जगणे मुश्किल होते इतके ते भांडतात. हे जरी खरे असले तरी कठिण प्रसंगात मात्र हे प्राणी एकमेकांची कायम साथ देताना दिसतात. जंगलात ज्याप्रमाणे प्राणी एकमेकांना कॉल देऊन शिकार होण्यापासून जीव वाचविण्यासाठी इतर प्राण्यांना मदत करतात त्याचप्रमाणे पाळीव प्राणीही अनेकदा इतर पाळीव प्राण्यांना काही ना काही बाबतीत मदत करताना किंवा साथ देताना दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक कुत्रा मांजराच्या पिल्लाला अतिशय क्यूट पद्धतीने मदत करताना दिसतो (Dog Save Kitten From Water Video Goes Viral). 

(Image : Google)

तर मांजराचे एगदी काही दिवसांचे एक छोटे पिल्लू पाण्यात अडकले असल्याचे दिसते. करड्या रंगाचे हे लहानसे पिल्लू भरपूर पाणी असलेल्या एका ठिकाणी एका दगडावर बसलेले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. लहान असल्याने या पिल्लाला कदाचित पाण्यातून जाण्याची भितीही वाटत असावी. काठ काहीसा लांब असल्याने आता पलिकडे कसे जायचे याचाच विचार हे पिल्लू कदाचित करत असावे. तितक्यात समोरुन एक पांढऱ्या रंगाचे कुत्रे तोंडात एक लाकडाची फळी घेऊन येताना दिसते. हे कुत्रे या मांजराच्या पिल्लासमोरच्या दगडावर अतिशय परफेक्ट रितीने ही फळी ठेवते आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहते. मग पिल्लूही या फळीवरुन हळूच पलिकडे जाताना दिसते. 

ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. १५ सेकंदांच्या व्हिडिओतून कुत्र्याने लहानसा पूल बांधत मांजरीच्या पिल्लाचे प्राण वाचवल्याने आपल्यालाही या कुत्र्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. अवघ्या एका दिवसांत या व्हिडिओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून प्राणीही एकमेकांना कशी साथ देतात तेच यातून दिसून येते. १ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला असून अनेकांनी तो रिट्विट करत त्यावर आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाकुत्रा