Join us  

मंदिरातली घंटा वाजवणाऱ्या कुत्र्याची भक्ती पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक, पाहा व्हायरल व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 12:16 PM

Dog viral video dog is ringing bell : व्हिडिओमध्ये जर्मन शेफर्ड कुत्र्याने मंदिरात घंटा वाजवल्याने आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात.  त्यातील काही व्हिडिओज जंगली प्राण्यांचे असतात तर काही पाळीव प्राण्यांचे. लोक आपल्या पाळीव प्राण्यांसोबतचे क्षण कॅमेरात कैद करतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जर्मन शेफर्ड डॉग मंदिरात घंटा वाजवताना दिसत आहे.  नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मंदिराच्या आत एक कुत्रा दिसतो, जिथे त्याला समोरच्या खिडकीसारख्या भिंतीवर काही तास बांधून ठेवले जाते. (Dog viral video dog is ringing bell in devotion to god inside temple video goes viral on social media)

व्हिडिओमध्ये कुत्रा बेलची दोरी पकडून वाजवताना दिसत आहे, जे पाहून सोशल मीडिया यूजर्सही चकीत झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अशीच एक शेळी मंदिरासमोर देवासमोर गुडघे टेकून डोके टेकताना दिसली होती. आता नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कुत्रा मंदिरात घंटा वाजवताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो लोक खूप बघत आहेत आणि शेअर करत आहेत.

व्हिडिओमध्ये जर्मन शेफर्ड कुत्र्याने मंदिरात घंटा वाजवल्याने आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3.5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओला 4 लाख 37 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया