आपल्या देवघरात किंवा पूजेसाठी आपण नेहमीच हार किंवा फुलांचा वापर करतो. दुसऱ्या दिवशी ही फुले सुकल्यानंतर आपण निर्माल्य म्हणून टाकून देतो. परंतु, टाकाऊपासून टिकाऊ असं आपण नेहमीच ऐकलं असेल.(Eco-friendly dhoop recipe) पूजा आणि घरातील इतर धार्मिक कार्यांसाठी धूपचा वापर केला जातो.
घराला सुगंधित आणि फ्रेश ठेवण्यासाठी आपण धुप लावतो.(Dried flower incense) अनेकदा यामध्ये केमिकल्सचे प्रमाण जास्त असते. ज्याचा आपल्याला आरोग्यावर परिणाम होतो. (Homemade natural incense) यामुळे कधी कधी आपल्याला संसर्ग किंवा श्वास घ्यायला त्रास होतो. आपण सुकलेल्या फुलांपासून केमिकल फ्री घरच्या घरी बनवू शकतो. अगदी कमी खर्चात ऑरगॅनिक धूप कसे तयार करता येईल पाहूया. (Ayurvedic incense DIY)
फरशी कितीही पुसा पिवळे- काळे डाग निघत नाहीत? सोपा उपाय, फरशी चमकू लागेल नव्यासारखी स्वच्छ
सगळ्यात आधी आपल्याला वापरेलेली फुले गोळा करुन उन्हात वाळवून घ्यायला हवी. ही फुले पूर्णपणे सुकल्यानंतर त्यात धूप, मोहरी, कापूर घालून मिक्सरमध्ये बारीक वाटा. तयार झालेल्या पावडरमध्ये तीन ते चार चमचे तूप घाला. त्यात आपण आवडीचे सुगंधीत तेल घालू शकतो. या मिश्रणाला हवा तसा आकार द्या आणि उन्हात सुकण्यास ठेवा. घरी तयार केलेला धूप तयार आहे. आपण आपल्याला हवे तेव्हा वापरू शकतो. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहिल.
आपण फुलांपासून हवनाचे सामान देखील बनवू शकतो. हे बनवण्यासाठी सुकलेली फुले उन्हाळ्यात वाळवून घ्या. त्यानंतर वाळलेली फुले, संत्र्याची साल, कापूर, थोडेसे लोभान, लवंग, दालचिनी आणि अगरबत्ती वाटून घ्या. यामध्ये तीन ते चार चमचे तूप आणि मध घाला. या मिश्रणाला आकार देऊन उन्हामध्ये सुकवा. पूजेच्या दरम्यान हवन सामग्री म्हणून याचा वापर करता येईल.