Join us  

कांद्याची सालं फेकून न देता 'असा' करा वापर, तेलकट शेगडी-कळकट मेणचट कढई चमकेल लख्ख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2024 3:49 PM

How To Use Onion Peel To Clean Dirty Utensils & Kitchen Cleaning : 4 ways to use onion peels beyond cooking : Don't Throw Away Onion Peels Here Are 4 Ways You Can Use To Clean Dirty Utensils & Kitchen Cleaning : कांद्याच्या साली वापरुन तुम्ही किचनमधील कोणकोणती काम करु शकता ते पाहा...

रोजचा स्वयंपाक करण्यासाठी आपण कांदा वापरतो. भाजीला फोडणी द्यायची असो किंवा तोंडी लावायला कोशिंबीर अशा पदार्थांमध्ये कांद्याचा वापर केला जातो. कांदा वापरताना आपण आधी त्याची सालं काढून तो सोलून घेतो आणि मग चिरुन पदार्थात घालतो. रोज अशा कांद्याची सालं सोलल्यानंतर ही सालं आपण थेट कचऱ्याच्या डब्यांत फेकून देतो. परंतु ही कांद्याची सालं (Onion Peel) कचऱ्यात फेकून न देता आपण त्याचा वापर करुन किचनमधील स्वच्छतेची अनेक काम करु शकतो, असं कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही(How To Use Onion Peel To Clean Dirty Utensils & Kitchen Cleaning).

कांदा फक्त अन्नपदार्थ तयार करण्यापुरताच नाही तर त्याच्या सालींचे देखील अनेक उपयोग आहेत. कांद्याच्या सालीत नॅचरल क्लिनिंग एजंट असतात. या सालींचा वापर करून आपण किचनमधील अनेक प्रकारचे हट्टी डाग अगदी सहजपणे काढू शकतो. यासाठीच कांदा कापल्यानंतर जर त्याच्या साली तुम्ही फेकून देत असाल तर असे ( 4 ways to use onion peels beyond cooking) न करता या सालींचा वापर करुन किचनमधील सफाईची काम अगदी झटपट करु शकता. कांद्याच्या सालींचा वापर करून तुम्ही किचनमधील कोणकोणती काम करु शकता ते पाहूयात(Don't Throw Away Onion Peels Here Are 4 Ways You Can Use To Clean Dirty Utensils & Kitchen Cleaning).

कांद्याच्या साली फेकून न देता त्यांचा 'असा' करा वापर... 

१. गॅस शेगडीचा चिकटपणा करा दूर :- गॅस शेगडी रोज वापरून चिकट - तेलकट होते. यावरील तेलाचे डाग सहजपणे जात नाही. यासाठी अशी चिकट तेलकट झालेली शेगडी स्वच्छ करण्यासाठी आपण कांद्याच्या सालींचा वापर करू शकता. एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित उकळवून घ्यावे. त्यानंतर या गरम उकळत्या पाण्यात कांद्याच्या साली व डिशवॉश लिक्विड सोपं घालावे. आता या मिश्रणाला हलकेच उकळी येऊ द्यावी. त्यानंतर गॅस बंद करून या पाण्यात  एक नॅपकिन बुडवून त्याने गॅस शेगडी पुसून घ्यावी. ज्या ठिकाणी हट्टी डाग आहेत त्यावर हे तयार द्रावण थेट घालूंन ब्रश किंवा स्क्रबरच्या मदतीने घासून घ्यावे. त्यानंतर स्वच्छ पाणी वापरून शेगडी पुन्हा पुसून घ्यावी.

तेलकट-चिकट झालेले स्टीलचे डबे न घासता होतील चकाचक, फक्त या जादुई पाण्याचा करा वापर...

२. लोखंडी कढई करा स्वच्छ :- लोखंडी कढई वापरुन त्यावर काळा चिकट थर जमा होतो. अशी कढई कितीहीवेळा घासली तरीही त्यावरील हे तेलकट डाग जात नाहीत. यासाठी कढई मंद आचेवर गरम करून घ्यावी त्यानंतर त्यात कांद्याच्या साली घालाव्यात. आता या कांद्याच्या साली संपूर्णपणे भाजून करपून काळा रंग येईपर्यंत परतून घाव्यात. त्यानंतर या साली थोड्या थंड झाल्यावर कढईतच हाताने कुस्करून त्याची पावडर करून घ्यावी. या पावडर मध्ये डिटर्जंट घालून स्क्रबरच्या मदतीने कढई स्वच्छ घासून घ्यावी. अशाप्रकारे लोखंडी कढई वरील तेलकट चिकट काळे डाग सहजपणे निघून जातील. 

स्वयंपाकाचीच नाही तर पूजेची भांडीही होतील स्वच्छ - चकचकीत! फक्त दिवाळीतील पणत्यांचा 'असा' करा वापर...

३. किचनमधील डस्टबीनची दुर्गंधी कमी करण्यासाठी :- किचनमधील डस्टबिनमध्ये आपण स्वयंपाक घरातील सगळा कचरा टाकतो. यामुळे या डस्टबीनमध्ये खुपच घाण, कुबट दुर्गंधी येत असते. डस्टबीनमधील ही दुर्गंधी कमी करण्यासाठी आपण कांद्याच्या सालींचा वापर करु शकतो. यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कांद्याच्या साली घालून ते पाणी उकळवून घ्यावे व या पाण्याने डस्टबिन स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे किचनमधील डस्टबिन स्वच्छ होऊन त्यातील घाण, कुबट दुर्गंधी निघून जाण्यास मदत होते.     

बटाटे उकडण्यापासून लसूण सोलण्यापर्यंत स्वयंपाकघरातल्या ‘या’ ९ कामांसाठी मायक्रोवेव्हचा करा वापर, स्वयंपाक होईल झटपट

४. किचनचा ओटा स्वच्छ करा :- किचनच्या ओट्यावरच आपण संपूर्ण स्वयंपाकाची तयारी करतो. यामुळे ओट्यावर अनेक प्रकारचे पदार्थ सांडून त्यांचे डाग तसेच राहतात. असे डाग घालवण्यासाठी किचनचा ओटा घासून स्वच्छ करावा लागतो. परंतु कांद्याच्या सालींचा वापर करून आपण किचनचा ओटा फारशी मेहेनत न घेता पटकन चकचकीत नव्यासारखा करु शकतो. यासाठी कांद्याच्या सालींची बारीक पावडर तयार करून घेऊन त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून डिटर्जंट आणि मीठ घालावे. हे मिश्रण ओट्यावर पसरवून घालावे त्यानंतर त्यावर किंचित पाणी शिंपडून स्क्रबरच्या मदतीने ओटा घासून घ्यावा. अधिक हट्टी डाग काढण्यासाठी टूथब्रशचा वापर करून डाग घासावेत. त्यानंतर अर्ध्या तासासाठी हे मिश्रण ओट्यावर तसेच ठेवावे. मग स्वच्छ पाण्याने ओटा पुन्हा एकदा धुवून घ्यावा.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स