Join us  

‘हा’ पदार्थ ठरला जगातील सर्वोत्तम पॅनकेक! सांबार-चटणीसोबत जमली गट्टी, बाकी सगळ्यांची छुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2024 1:39 PM

dosa ranked among worlds best pancakes Taste Atlas list : पारंपरिक साऊथ इंडीयन डीश असलेल्या डोशाने भारताला या यादीत मानाचे स्थान मिळवून दिले आहे.

डोसा किंवा मसाला डोसा हा आपल्यापैकी अनेकांच्या आवडीचा पदार्थ. साऊथ इंडियन डीशपैकी एक असलेल्या या डोशाचे बरेच प्रकार आपण हॉटेलमध्ये गेलो की खातो. यात साधा डोसा, घी डोसा, मसाला डोसा, मैसूर डोसा, टोपी डोसा, सेट डोसा, स्प्रिंग डोसा असे बरेच प्रकार मिळतात. डाळ आणि तांदळाच्या पिठापासून केला जाणारा हा डोसा चवीला जितका छान असतो तितकाच तो करायला सोपा असतो आणि पोटभरीचाही असतो. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना डोसा मनापासून आवडतो. याच प्रसिद्ध अशा भारतीय डोशाची नोंद जागतिक स्तरावर घेतली गेली आहे (dosa ranked among worlds best pancakes Taste Atlas list). 

(Image : Google)

टेस्ट अॅटलासतर्फे खाण्याच्या विविध पदार्थांची क्रमवारी कायम जाहीर करण्यात येते. आता पॅनकेकच्या यादीमध्ये भारतीय डोश्याची वर्णी लागली आहे. यामध्ये पहिल्या आणि पाचव्या क्रमांकावर फ्रान्सचा पॅनकेक असून दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रीया, तिसऱ्या क्रमांकावर चायना आणि चौथ्या क्रमांकावर थायलंडच्या पॅनकेकचा समावेश आहे. भारतीय डोसा या यादीत दहाव्या क्रमांकावर असून बाराव्या क्रमांकावर मसाला डोसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक साऊथ इंडीयन डीश असलेल्या डोशाने भारताला या यादीत मानाचे स्थान मिळवून दिले आहे. 

(Image : Google)

डोसा हा साऊथ इंडीयन पदार्थ असला तरी तो देशाच्या सर्वच भागात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. गरमागरम डोसा सोबत चटणी, सांबार आणि बटाट्याची भाजी हे कॉम्बिनेशन अतिशय प्रसिद्ध आहे. Taste Atlas यांच्यावतीने २०२४ या वर्षीसाठी नुकतीच जगभरातील विविध देशातील पॅनकेकची एक यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये भारतातील पॅनकेकचा समावेश असल्याने भारतीयांसाठी ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. याआधी २०२३ मध्ये भारतातील काजूकतली आणि रसमलाई यांसारख्या गोड पदार्थांची या यादीत नोंद करण्यात आली होती. याशिवाय इतरही बऱ्याच भारतीय पदार्थांनी या यादीत स्थान मिळवलं आहे.   

टॅग्स :सोशल व्हायरलअन्न