Lokmat Sakhi >Social Viral > Dress Selection for Holi: रंग खेळताना कोणते कपडे घालताय? रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून ६ महत्वाच्या टिप्स

Dress Selection for Holi: रंग खेळताना कोणते कपडे घालताय? रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून ६ महत्वाच्या टिप्स

Happy Holi 2022: रंग खेळताना आपण सहसा जुने कपडे घालतो (best outfit for holi)... आजकाल खास रंगांसाठी नवे कपडे घेण्याचाही ट्रेण्ड आहे... जुने किंवा नवे कोणतेही कपडे घाला पण या ६ गोष्टी मात्र हमखास लक्षात ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 12:18 PM2022-03-17T12:18:03+5:302022-03-17T12:18:58+5:30

Happy Holi 2022: रंग खेळताना आपण सहसा जुने कपडे घालतो (best outfit for holi)... आजकाल खास रंगांसाठी नवे कपडे घेण्याचाही ट्रेण्ड आहे... जुने किंवा नवे कोणतेही कपडे घाला पण या ६ गोष्टी मात्र हमखास लक्षात ठेवा..

Dress Selection for Holi: 6 Important tips about how to choose best outfit for holi | Dress Selection for Holi: रंग खेळताना कोणते कपडे घालताय? रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून ६ महत्वाच्या टिप्स

Dress Selection for Holi: रंग खेळताना कोणते कपडे घालताय? रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून ६ महत्वाच्या टिप्स

Highlightsकपड्यांबाबत इतरही अनेक गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक तरुणीने, महिलांनी रंग खेळताना लक्षात ठेवल्याच पाहिजेत..

रंगपंचमी म्हणजे नुसता उत्साह आणि आनंद... बेधुंद होऊन, स्वत:ला विसरून मोकळेपणाने रंग खेळण्यात खरी मजा... बुरा ना मानो होली है.. असं म्हणत या दिवशी एकमेकांना जाम रंग (Holi Celebration 2022) लावले जातात.. काही ठिकाणी तर नुसत्या पाण्याने होळी खेळतात.. एकमेकांना पकडून, प्रसंगी ओढून, बळजबरीने घराबाहेर काढून अशा कित्येक प्रकारांनी रंग खेळला जातो.. उत्साहापोटी या सगळ्या गोष्टी होत असल्या तरी या ओढाताणीत आपले कपडे मात्र शाबूत रहायला हवेत.. शिवाय कपड्यांबाबत इतरही अनेक गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक तरुणीने, महिलांनी रंग खेळताना लक्षात ठेवल्याच पाहिजेत.. (clothes selection for holi)

 

रंग खेळताना कपड्यांबाबत अशी काळजी घ्या...
१. रंग खेळताना सहसा जुने कपडे घालतात. पण जुने कपडे खूप जास्तही जुने झालेले, विरलेले नको. नाहीतर रंग खेळताना होणाऱ्या ओढाताणीत, झटापटीत कपडे फाटू शकतात.
२. नवे कपडे घेणार असाल तर ते आधी पाण्यात टाकून भिजवून घ्या आणि नंतर घाला. कोरे कपडे खेळून होळी खेळू नका. 
३. रंगपंचमीला खास करून तरुणींनी होजिअरी किंवा कॉटनचे जाडसर कपडे घालावेत. कारण तुम्ही पाण्याने भिजल्यावर पातळ कपडे शरीरावर चिकटतात आणि मग ते खूप विचित्र दिसून आपण स्वत: खूप अनकम्फर्टेबल होतो. 


४. पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे (white dress in holi) घालणार असाल तर इनरवेअरही पांढरेच असू द्या. अन्यथा पाण्याने कपडे भिजले की खूप ऑकवर्ड परिस्थिती निर्माण होते... त्यामुळे शक्यतो रंग खेळताना गडद रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य द्यावे. 
५. जीन्स- शर्ट, कुर्ता- पायजामा असे कोणत्याही प्रकारातले कपडे घातले तरी एक स्टोल यादिवशी आवर्जून गळ्यात ठेवा. 
६. खूप घट्ट किंवा तंग कपडे रंग खेळताना घालू नका. 

 

Web Title: Dress Selection for Holi: 6 Important tips about how to choose best outfit for holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.