Join us  

२४ कॅरेट सोन्याचा चहा प्यायचा? किंमत किती, आपल्याला परवडेल का पाहा हा नवाबी चहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2023 8:07 PM

Lucknow eatery sells ‘24 carat gold chai’, video sparks mixed reactions : चक्क सोन्याचा चहा काय आहे ही नेमकी भानगड ? पहा व्हायरल चहाची गोष्ट..

चहाच्या चाहत्यांची आपल्या जगात काहीच कमी नाही. चहाचे चाहते सर्वत्र जगभर पसरलेले आहेत. भारतीयांमध्ये चहाचं वेड इतकं आहे की आपल्याला  जागोजागी चहाचे स्टॉल पाहायला मिळतात. अनेकांची तर सकाळ चहानेच सुरू होते. म्हणूनच या पेयाला 'अमृतपेय' असे म्हटले जाते. सकाळ असो वा, संध्याकाळ चहाप्रेमी कधीही चहासाठी तयार असतात. चहाला नाही म्हणणाऱ्या लोकांची संख्या आपल्याकडे फार कमी आहे. चहाला वेळ नसली तरी वेळेला चहा लागतो अस एक वाक्य या चहाप्रेमींच्या मुखात नेहमीच असतं. चहाप्रेमी चहासाठी इतके वेडे असतात की, त्यांना कधीही, कुठेही, केव्हाही चहा आणून दिलात तर त्या ठिकाणी त्या चहाचा मनापासून आनंद घेतील. 

भारतात कोणत्याही राज्यात तुम्हाला चहा नक्कीच प्यायला मिळेल. भले त्या चहाची चव वेगवेगळी असेल किंवा दिसताना ती वेगळी दिसत असेल परंतु चहाप्रेमींसाठी कुठलाही चहा हा तितकाच प्रिय असतो. सध्या सोशल मीडियावर आपल्या पारंपरिक पदार्थाचे हटके रुप किंवा जुन्या रोजच्या पदार्थाना दिलेला नवीन टच असे अनेक व्हिडीओ पहायला मिळतात. आता पर्यंत आपण कुल्लड चहा, मसाला चहा, गुळाचा चहा, बासुंदी चहा, तंदूर चहा असे चहाचे असंख्य प्रकार ऐकले किंवा पिऊन पाहिले असतील. पण तुम्ही कधी अस्सल सोन्याचा २४ कॅरेट असलेला चहा प्यायला आहात का ? होय, अस्सल सोन्याचा चहा... बघूयात नेमकी काय आहे ही भानगड ?(Lucknow eatery sells ‘24 carat gold chai’, video sparks mixed reactions).

चक्क सोन्याचा चहा काय आहे ही नेमकी भानगड ?

सध्या सोशल मिडीयावर २४ कॅरेट सोन्याच्या चहाची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होताना दिसत आहे. सोशल मिडीयावर लखनऊच्या एका फूड ब्लॉगरने हा सोन्याच्या चहाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एका चहाच्या ठेल्यावर सोन्याच्या फॉईलसोबत चहा ग्राहकांना सर्व्ह केला जात आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सुप्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर रिची रिचला टॅग करण्याचा सल्ला देऊन लिहिले होते, Tag या  Richi Rich, Who Can Try This... गडगंज संपत्ती असलेल्या रिची रिचकडे सर्व काही सोन्याचं होत. या सोन्याचा चहाच्या एका कपची किंमत १५० रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये, लखनौच्या रस्त्यांवर २१ कॅरेट टी (21 Carat Tea) अशा नावाचा एक छोटासा फूड ट्रक लावलेला दिसत आहे. या फूड ट्रकवर एका मोठ्या काचेच्या मगमध्ये चहा गाळला जात आहे. चहा गाळून झाल्यानंतर त्यात मलई मिसळली जाते. त्यानंतर या चहावर बर्फीला जसा वर्ख लावला जातो, त्याचप्रमाणे चहावर सोन्याचा वर्ख हलक्या हातांनी लावला जात आहे. 

फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो, फ्रिजमधून पाणी गळू लागते ? ७ सोपे उपाय, कुलिंगही होईल चांगले...

देखणी नाजूकसाजूक बार्बी बदलली, ही नवीन डाऊन सिंड्रोम बार्बी सांगतेय...

हा सोन्याचा चहा पाहून नेटकरी म्हणत आहेत... 

Eattwithsid अकाउंटवरुन शेअर केलेला हा व्हिडीओ सहा हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्स हसरा चेहेरा आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत आणि मस्त असल्याचं म्हणत आहेत. तर काही युजर्स हे काहीही आहे. एक युजरने हे धोकादायक असल्याचे देखील म्हटले आहे.

टॅग्स :सोशल व्हायरल