घरफोडी होण्याच्या, दुकानात चोरी होण्याच्या घटना आपण नेहमीच वाचतो- ऐकतो. हल्ली तर मोबाईल चोरीच्या घटनाही नेहमीच ऐकू येतात. त्यातले काही मोबाईल सापडतात, तर काही कधीच सापडत नाहीत. सध्या मोबाईल चोरीची जी घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे, त्यातही मोबाईल चोरी गेला यात काहीच नाविन्य नाही. पण तो चोरलेला मोबाईल कशा पद्धतीने त्याच्या मुळ मालकाला सापडला, याची गोष्ट मात्र खूपच रंजक आहे.(Viral Story Of Mobile Theift)
तर मोबाईल चोरीची ही पोस्ट ज्याचा मोबाईल चोरीला गेला होता, खुद्द त्यानेच सोशल मिडियावर शेअर केली आहे. तो म्हणतो की गोव्यामध्ये असताना मी ही थोडी दारू प्यायलो होतो आणि तो चोरही दारू प्यायलेला होता.
खूप थकवा येतो- गळून गेल्यासारखं होतं? स्मृती इराणींनी सांगितलेलं 'हे' सूप प्या- अशक्तपणा जाईल
त्या चोराने माझ्याकडून मोबाईल चोरून घेतला. त्यानंतर त्याला बहुतेक भूक लागली असावी, त्यामुळे तो पावभाजी खाण्यासाठी एका लहानशा हॉटेलमध्ये गेला. त्याने पावभाजी तर मागवली पण त्याचे बिल देण्यासाठी त्याच्याकडे बहुतेक पैसे नव्हते. त्यामुळे मग त्याने खिशातला मोबाईल काढला आणि त्यावर काहीतरी खटपट करू लागला.
अशातच मोबाईलची बॅटरीही कमी झाली. त्यामुळे मग हॉटेल चालकाने त्याची परिस्थिती ओळखून मोबाईल स्वत:च चार्जिंगला लावला. दारु प्यायल्याने त्याला काही सुचत नाही असे दुकानदारास वाटले. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना मोबाईलचा जो मुळ मालक होता, त्याने मोबाईलवर रिंग देऊन पाहिली.
फोन वाजतो आहे, हे पाहून हॉटेल चालकाने स्वत:च फोन उचलला आणि मग त्याला मोबाईलच्या मालकाकडून मोबाईल चोरीविषयीच्या सगळ्या घटनेचा उलगडा झाला. यानंतर मोबाईल मालकाने पत्ता विचारून ते हॉटेल गाठले आणि तो मोबाईल ताब्यात घेतला. चोरट्याची भूक मोबाईल परत मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीने कारणीभूत ठरली पाहा... ही स्टोरी सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.