Join us  

१ नंबर! आईच्या सांगण्यावरून पोरगी दुबईहून भारतात १० किलो टोमॅटो घेऊन आली....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 7:39 PM

Dubai-Based Daughter Brings 10 kg Tomatoes To India On Mom's Demand : भारतात येण्यापूर्वी तिने आईला विचारले होते की, ''मी दुबईहून भारतात येत आहे. तुला काही आणायचे आहे का?''

भारतभरात टोमॅटोच्या वाढलेल्या भावांची सध्या चर्चा आहे. सफरचंदापेक्षा टोमॅटो महाग झाल्यानं  टोमॅटोचं नाव काढताच चर्चांना उधाण येत आहे. अनेकांनी टोमॅटोला पर्यायी पदार्थ वापरण्यास सुरूवात केली आहे. महागाईमुळे लोकांनी टोमॅटो खाणे बंद केले आहे. (Daughter Brings 10 kg Tomatoes To India On Mom's Demand, Twitter Reacts) एक दिवस टोमॅटो एवढा महाग होईल की त्यासमोर पेट्रोल स्वस्त होईल, अशा कमेंट्स लोक करत आहेत. टोमॅटोशी संबंधित अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही विक्रेत्यांनी तर टोमॅटो चोरीला जाण्याच्या भितीनं दुकानात बाऊंसर देखील ठेवले होते.  ही पोस्ट पाहून लोकांमध्ये हशा पिकला. (Dubai-based Daughter Brings 10 Kg Tomatoes As Gift For Mother In India)

टोमॅटोच्या किमतीत सरकारने थोडा दिलासा दिला असला तरी टोमॅटो मात्र 80 रुपये किलोने विकला जात आहे. यामुळे लोक आणखी स्वस्त टोमॅटोसाठी जुगाड करत आहेत. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये एका यूजरने सांगितले की, तिच्या आईने दुबईहून येणाऱ्या बहिणीकडून 10 किलो टोमॅटो मागवले आहेत.

ट्विटर युजरने सांगितले की तिची बहिण सुट्टीसाठी भारतात येत आहे. भारतात येण्यापूर्वी तिने आईला विचारले होते की, ''मी दुबईहून भारतात येत आहे. तुला काही आणायचे आहे का?'' यावर उत्तर देताना युजरच्या आईने सांगितले की, तू येताना 10 किलो टोमॅटो घेऊन ये. भारतात टोमॅटो खूप महाग झाले आहे.

ऑफिसहून दमूनभागून आल्यावर स्वयंपाक करताना धावपळ होते? ७ ट्रिक्स- स्वयंपाक होईल झटपट

युजरने ट्विटरवर लिहिले की, माझी बहीण तिच्या मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी दुबईहून भारतात येत आहे. तिने आईला विचारले होते की तुला दुबईहून काही आणायचे आहे का? यावेळी उत्तरात आई म्हणाली 10 किलो टोमॅटो आण. आता माझ्या बहिणीने 10 किलो टोमॅटो एका सुटकेसमध्ये पॅक करून पाठवले आहेत. तिने पर्लपेट स्टोरेज जारमध्ये टोमॅटो पॅक केले होते आणि ते सूटकेसमध्ये ठेवले होते.  त्यामुळे आता घरात जास्तीत जास्त टोमॅटो वापरले जात आहेत असंही या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.सोशल व्हायरलदुबई