Join us  

अरे याला किती घाई..! नवऱ्यानं घेतला असा काही उखाणा घेतला; नवरी लाजली अन् पाहुणेम्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 11:28 AM

Dulha Dulhan ka Viral Video Bride and Groom : लग्नात काय एकेक विनोद होतील त्याचा भरवसा नाही.

सोशल मीडियावरलग्नसमारंभाचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. (Viral video bride and groom wedding funny video viral)  कधी नवरी नवरीची धमाकेदार एंट्री तर कधी वरातीतला डान्स तर कधी मित्र मैत्रिणींची मस्ती लक्ष वेधून  घेते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुम्हालाही खूप हसायला येईल. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक नवरा लग्नाच्या मंडपात असा काही उखाणा घेतो ते ऐकून तिथले सगळेच उपस्थित लोक हसायला लागतात. (Dulha dulhan ka viral video bride and groom wedding funny video viral on social media)  नवरा किंवा नवरी काय उखाणा घेणार याचं सगळ्यांनाच आकर्षण असतं. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नवरा नवरी मंडपात बसले आहेत. त्यांच्या आजूबाजूला बरेच लोक बसले आहेत आणि लग्नाचे विधी पार पाडले जात आहेत. नवरा ज्यावेळी उखाणा  घेतो त्यावेळी तिथे उपस्थित सर्वचजण हसून हसून पागल होतात.  हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'dh.iraj1305' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, हा व्हिडीओ यूजर्सना खूप आवडला आहे.

अरे त्यांना पॅरेशूट द्या..! लग्नात वडीलांसोबत लेकीनं घेतली रॉयल एंट्री, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले...

या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर वापरकर्ते विविध मनोरंजक आणि मजेदार प्रतिक्रिया देतात. एका यूजरने 'वराला घाई आहे' असे म्हटले आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, 'बडे भारी ड्रायवर हो यार. अशा विनोदी कमेंट करत वराच खिल्ली उडवली आहे. 

टॅग्स :लग्नसोशल मीडियासोशल व्हायरल