आजकाल प्रत्येक व्यक्ती इअरबड्सचा वापर करीत आहे. गाणं ऐकण्याव्यक्तिरिक्त लोकं यातून कॉलवर संवाद साधतात. इअरबड्सचा अनेक प्रकारे वापर करण्यात येऊ शकतो. काही इअरबड्स अनेक वर्ष टिकतात. तर काही लवकर खराब होतात. इअरबड्सचा आपण ज्या प्रकारे वापर करतो, त्याच प्रमाणे त्याची सफाई करतो का?
सततच्या वापरामुळे इअरबड्समध्ये मेणासारखी घाण, धूळ साचते. अशा परिस्थितीत इअरबड्स वेळेवर साफ न केल्यास कानात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. काही लोकांना इअरबड्स कसे साफ करायचे हे माहित नसतं. इअरबड्स लवकर खराब होऊ नये, असे वाटत असेल तर या काही ट्रिक्स फॉलो करून पाहा, या ट्रिक्समुळे इअरबड्स सहज स्वच्छ करता येईल(Earbuds cleaning guide and tips).
इअरबड्स कितीवेळा साफ करायला हवे
जर आपण इअरबड्स दररोज वापरत असाल तर, त्यात धूळ, व कानातील मेण साचू लागते. ही घाण आठवड्यातून एकदा साफ करायला हवी. कारण यामुळे कानात संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
स्वयंपाकघरात खूप पसारा होतो, आवरता आवरत नाही? ८ टिप्स, स्वयंपाकघर कायम चकाचक
इअरबड्स साफ करण्यासाठी लागणारं साहित्य
डिशवॉशिंग लिक्विड
लहान वाटी
कापूस
दात घासण्याचा ब्रश
मायक्रोफायबर कापड
अशा पद्धतीने करा इअरबड्सची सफाई
सर्वप्रथम, एक छोटी वाटी घ्या. त्यात एक चमचा डिशवॉशिंग लिक्विड, अर्धा कप गरम पाणी घालून मिक्स करा. इअरबड्समधून फोम व सिलिकॉन टिप्स काढा आणि तयार मिश्रणात ३० मिनिटांसाठी घालून भिजत ठेवा. ३० मिनिटानंतर सिलिकॉन कॅप बाहेर काढून कोरडी होण्यासाठी ठेवा.
इअरबड्समध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी कापसाचा वापर करा. कापूस गरम पाण्याच्या मिश्रणात बुडवा, व हलक्या हाताने साफ करा. व त्यानंतर लिंट - फ्री कापडावर सुकवण्यासाठी ठेवा. शेवटी दात घासण्याच्या ब्रशने इअरबड्सची वायर साफ करा. व पुसून क्लिन करा.
मला वेड लागले रील्स बघण्याचे! असं झालं असेल तर सावधान, मायग्रेनचा धोका आणि..
इअरबड्स दीर्घकाळ साफ ठेवण्यासाठी टीप
इअरबड्सचा वापर केल्यानंतर त्याला लगेच कव्हरमध्ये ठेवा. कारण बाहेर ठेवल्यानंतर त्यात धूळ साचण्याची शक्यता वाढते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, डोक्यातून घाम आल्यानंतर थेट इअरबड्समध्ये जाऊन जमा होतो. ज्यामुळे इअरबड्स खराब होण्याची शक्यता निर्माण होते. अशा स्थितीत आठवड्यातून एक वेळा इअरबड्स स्वच्छ करा.