जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणाचा वापर केल जातो. लसणाचा वास आणि सुगंधामुळे कोणत्याही पदार्थाला वेगळी चव मिळते. याची सालं काढणं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. (Lasun patkan kase solave)ज्या लोकांना ही ट्रिक माहीत नसते त्यांना लसूण सोलायला जवळपास ५ ते १० मिनिटं लागतात. अनेकांच्या नखांमध्ये लसूण अडकतात आणि बोटांची आग, जळजळ होते. (Easiest Way to Peel Garlic)
लसूण मायकोव्हेव्हमध्ये ठेवा
जर तुमच्या घरी मायक्रोव्हेव्ह असेल तर ३० सेकंदांसाठी तसेच ठेवा. त्यानंतर लसणाची सालं काढून वेगळी करा. मायक्रोव्हेव्हऐवजी तुम्ही लसूण तव्यावरही भाजू शकता.
लसूण पाण्यात भिजवा
लसणाचे साल काढणं तुम्हाला कठीण वाटत असेल तर २ मिनिटांसाठी तसंच ठेवून द्या. त्यानंतर लसूण मॉईश्चचरमुळे फुलून येईल. त्यानंतर तुम्ही लसणाचे साल सहज वेगळे करू शकता.
लसूण सुरीने कापून घ्या
लसणाचे सुरीच्या साहाय्याने मोठे काप करा. त्यानंतर लसणाचे साल आपोआप वेगळे होईल. हे लसूण तुम्ही वाटणासाठी वापरू शकता किंवा साल निघाल्यानंतर अजून बारीक काप करून भाजीत, फोडणीत घाालू शकता.
५ मिनिटांत स्वच्छ होतील जळालेली काळी भांडी, सोपा उपाय-नवीकोरी चकाकतील पातेली
सुरीचा वापर
लसूण सोलण्यासाठी तुम्ही सुरीचा वापर करू शकता. यासाठी धार असलेल्या सुरीचा वापर करा. जेणेकरून लसणाचं साल पूर्ण निघून जाईल. याव्यतिरिक्त तुम्ही लसणाचं साल काढण्यासाठी दगडाचाही वापर करू शकता. यासाठी लसूण थोड्याफार प्रमाणात बारीक करून घ्या त्यानंतर साल काढा.
लसूण सोलण्यासाठी एका डब्यात लसणाच्या पाकळ्या घालून झाकण बंद करून वर खाली हलवा या उपायाने सालं सहज निघतील. लसूण सोलल्यानंतर हाताला वास तसाच राहतो. हा वास घालवण्यासाठी तुम्ही हातांवर एपल सायडर व्हिनेगर किंवा नारळाचं तेल लावू शकता.
चणे आणि गूळ खाल्ल्यानं वजन वाढतं का? चणे कोणी खावेत-किती प्रमाणात खावेत, समजून घ्या
जर तुम्हाला लसूण सोलायला अजिबात आवडत नसेल तर तुम्ही चपाती लाटण्याच्या लाटण्याचा वापर करू शकता. यामुळे लसणाची सालं सहज निघतील आणि जास्त वेळही लागणार नाही. त्यासाठी लसूण लाटण्याच्या साहाय्याने लाटून सपाट करा. २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास तुम्हाला दिसेल की लसणाची सालं अगदी सहज निघाली आहेत. हे लसूण काही न करता स्वच्छ होतील.