घराच्या स्वच्छतेसोबतच बाथरूमची स्वच्छताही महत्त्वाची आहे (Cleaning Tips). काही लोक बाथरूम साफ करतात पण तिथे ठेवलेल्या वस्तू साफ करायला विसरतात. उदाहरणार्थ बादल्या साफ करायला विसरतो (Social Viral). बादल्या बरेच महिने साफ नाही केल्यास त्यावर पांढरे डाग निर्माण होतात. जे सहसा घासूनही निघत नाही. हे हट्टी डाग काढणे फार कठीण होते.
ज्या घरांमध्ये पाण्यात भेसळ होऊन येते, त्या घरातल्या बादल्या डागाळलेले होतात. बदल्यांवरचे डाग जर घासूनही निघत नसतील तर, ३ घरगुती गोष्टींचा वापर करून पाहा. या उपायांमुळे हट्टी पाण्याचे डाग लवकर निघतील. शिवाय बादल्या नव्यासारख्या चमकतील(Easy 3 ways to Clean Buckets or Mugs).
हट्टी पाण्याचे डाग घालवण्यासाठी बादल्या कशा स्वच्छ कराव्या?
बाथरूम क्लीनर
बाथरूम स्वच्छ करण्यासाठी आपण बाथरूम क्लीनरचा वापर करतो. आपण याने बादल्या देखील स्वच्छ करू शकता. यासाठी स्क्रबरवर बाथरूम क्लीनर घ्या, याने बादल्या आणि बाथरूम स्टूलही स्वच्छ करा. यामुळे कमी वेळात बादल्या आणि स्टूल स्वच्छ होतील.
अॅसिड
कोणतेही डाग काढण्यासाठी अॅसिडचा वापर केला जाऊ शकते. यासाठी पाण्यात अॅसिड मिक्स करा. याने बाथरूमचे मग, बादल्या किंवा इतर गोष्टी स्वच्छ करा. यामुळे पांढरे डाग, घाण स्वच्छ होईल. पण अॅसिडचा वापर करत असताना हातात हातमोजे घालायला विसरू नका.
बेकिंग सोडा आणि लिंबू
पाण्याचे डाग घालवण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घेऊन मिक्स करा. तयार पेस्ट मग आणि बादल्यांच्या डागांवर लावा. नंतर स्क्रबरच्या मदतीने बादली - मग घासून काढा. यामुळे मग आणि बादली नव्यासारखे चमकतील.