Lokmat Sakhi >Social Viral > पीठ चाळताना बाहेर उडते, सगळीकडे पसारा, पीठही वाया? १ सोपी ट्रिक, पीठ अजिबात वाया जाणार नाही..

पीठ चाळताना बाहेर उडते, सगळीकडे पसारा, पीठही वाया? १ सोपी ट्रिक, पीठ अजिबात वाया जाणार नाही..

Easy and Important Kitchen Hack : अशावेळी एकतर घरभर पसारा तर होतो आणि पीठही वाया जातं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2023 12:44 PM2023-06-05T12:44:07+5:302023-06-05T14:12:03+5:30

Easy and Important Kitchen Hack : अशावेळी एकतर घरभर पसारा तर होतो आणि पीठही वाया जातं.

Easy and Important Kitchen Hack : Flour flies out while sifting, spread everywhere, waste flour too? 1 simple trick, no flour will go to waste.. | पीठ चाळताना बाहेर उडते, सगळीकडे पसारा, पीठही वाया? १ सोपी ट्रिक, पीठ अजिबात वाया जाणार नाही..

पीठ चाळताना बाहेर उडते, सगळीकडे पसारा, पीठही वाया? १ सोपी ट्रिक, पीठ अजिबात वाया जाणार नाही..

आपण स्वयंपाकासाठी विविध प्रकारच्या पीठांचा वापर करतो. गव्हाचे पीठ असो किंवा ज्वारीचे, डाळीचे अशी सगळी पीठे बाजारातून तयार आणल्यावर किंवा गिरणीतून दळून आणल्यावर चाळून घ्यायची अनेकांना सवय असते. हे पीठ चाळण्यासाठी आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण्या असतात. अगदी लहान चहाच्या गाळणीच्या आकारापासून ते मोठ्या चाळण्यांपर्यंत बऱ्याच बरेच प्रकार आपल्याकडे असतात. पण पीठ हे वजनाने हलकं असतं आणि पेपर किंवा कितीही मोठी परात घेऊन पीठ चाळायला बसलं तरी ते सगळीकडे उडतंच. अशावेळी एकतर घरभर पसारा तर होतोच, पण पीठ गोळा करणंही शक्य नसतं (Easy and Important Kitchen Hack).

घाईच्या वेळी लिपस्टीक, काजळ सापडतच नाही, ड्रेसिंग टेबल नीटनेटकं ठेवण्याची सोपी ट्रिक...

त्यामुळे अन्न वाया जातं आणि महागामोलाचं असल्याने पैसेही वाया जातात. पीठ चाळून घेतलं नाही तर त्यामध्ये फोलपटं, जाळ्या-आळ्या किंवा आणखी काही असेल तर ते तसेच राहते. म्हणूनच पीठ चाळण्याची परफेक्ट पद्धत आज आपण पाहणार आहोत ज्यामुळे पसाराही होणार नाही आणि पीठही अगदी व्यवस्थित आपण घेतलेल्या भांड्यातच चाळलं जाईल. इन्स्टाग्रामवर सोनल गिरीश वेटे यांच्या न्यूट्रीबीट अॅप या पेजवर अगदी काही सेकंदांचा हा व्हिडिओ अपलोड कऱण्यात आला आहे. अतिशय सोपे वाटणारे पण महत्त्वाचे हे काम सोपे कसे होईल हेच यामध्ये दाखवण्यात आले आहे. 

१. आपण नेहमी पीठ चाळायला जी बारीक जाळीची चाळणी घेतो तीच घ्यायची. 


२. त्यामध्ये डावाने, वाटीने किंवा आणखी कशाने पीठ न घालता थेट काचेचा मोठा ग्लास घेऊन त्याने पीठ घालायचे. 

३. पीठ घातल्यानंतर हा ग्लास त्यावरुन न काढता एका हाताने तोच गोलाकार फिरवायचा म्हणजे पीठ आपल्याला हव्या त्याच अंशात खालच्या भांड्यात पडते. 

४. एका हाताने चाळणी आणि एका हाताने पीठाचा ग्लास असे धरलेले असल्याने सुरुवातीला हे थोडेसे अवघड वाटू शकते. पण एकदा करुन पाहिल्यानंतर पीठ अजिबात वाया जात नसल्याने आणि पसारा होत नसल्याने ही पद्धत फार छान वाटते.

५. आपण साधारणपणे चाळणी उजवीकडे आणि डावीकडे हलवतो त्यामुळे पीठ आजुबाजूला पसरते. पण यामध्ये चाळणी हलवायचीच नसून फक्त आतला ग्लास हलवायचा असल्याने काम सोपे होते.   

Web Title: Easy and Important Kitchen Hack : Flour flies out while sifting, spread everywhere, waste flour too? 1 simple trick, no flour will go to waste..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.