बाथरूमध्ये बादली आणि मग या दोन वस्तूंचा वापर रोज केला जातो. जेव्हा आपण मग आणि बादल्या नवीन घेतो तेव्हा त्या एकदम स्वच्छ आणि चकचकीत असतात. पण जसाजसा वापर वाढतो तसतसं बादल्यांवर हट्टी डाग येऊ लागतात. हे डाग घालवण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूहनी हवातसा परिणाम दिसत नाही. (Easy Bathroom Cleaning Tips) हे डाग इतके हट्टी असतात की सामान्य साबणाच्या वापरानंही ते निघत नाहीत. एकदम सोप्या घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही बादली आणि मग यांवर साचलेला काळा थर, डाग स्वच्छ करू शकता. (How to clean bucket and mug)
मग आणि बादलीवरचे डाग काढण्याच्या टिप्स
१) जर बादली किंवा मगवर हट्टी डाग लागले असतील तर ते काढून टाकण्यासाठी बेकींग सोडा, लिंबाचा रस आणि डिटर्जेंट एका भांड्यात काढून मिक्स करा. त्यानंतर बादलीवर हे मिश्रण ब्रशने लावा. १० मिनिटं तसंच ठेवून नंतर बादल्या ब्रशने स्वच्छ घासा आणि नंतर पाणी घालून स्वच्छ धुवा.
२) एका भांड्यात 2 कप व्हिनेगर आणि तुम्ही पाणी घ्या. हे मिश्रण तयार केल्यानंतर स्पंजच्या मदतीने बादली घासून घ्या. या उपायानं बादल्या आणि मग वरचा पिवळेपणाही निघून जाईल.
३) बादली आमि मग स्वच्छ करण्यासाठी डायड्रोजन पेरॉक्साईडसु्दधा चांगला पर्याय आहे. यामुळे फक्त पिवळेपणा कमी होत नाही तर हट्टी डागही निघून जातात. यासाठी पाण्यात हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळा. या लिक्विडमध्ये ब्रश बुडवून ब्रशनं बादली घासा नंतर स्वच्छ पाण्यानं धुवा.
थकवा-अशक्तपणा जाणवतो, B-12 कमी? भरपूर व्हिटामीन B-12 असणारे ५ पदार्थ खा रोज
४) सर्वप्रथम एका भांड्यात १ कप पाण्यात ब्लीच टाका. आता हातमोजे घाला. आता या पेस्टमध्ये स्वच्छ कापड भिजवा. या कापडाने बादली पुसून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. या उपायानं बादल्या पूर्णपणे स्वच्छ होतील.
५) सगळ्यात आधी बादली स्वच्छ पाण्याने धुवा. आता कोणत्याही भांड्यात डिशवॉश आणि लिंबाचा रस मिसळा. आता ही पेस्ट टूथब्रशच्या मदतीने बादलीवर लावा आणि चांगली घासून घ्या. जर बादली खूप घाण असेल तर कमीतकमी 5-10 मिनिटे स्क्रब करा. आता बादली पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवा. बेकिंग सोड्यामुळे डाग लगेच निघतील आणि बादली नवीकोरी दिसेल.