दिवाळी आता मोजक्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे घरोघरी साफसफाई मोठ्या उत्साहात सुरू आहे (Easy Cleaning Tips For Diwali). घराचा प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ करायचा म्हणजे खरोखरच मोठं कौशल्याचं आणि संयम ठेवून करण्याचं काम आहे. त्यातल्या त्यात स्वयंपाक घरातला पसारा काढायचा म्हणजे तर सगळ्यात अवघड. कारण लहानशा चमच्यांपासून ते मोठमोठाल्या भांड्यांपर्यंत असंख्य वस्तू तिथे ठेवलेल्या असतात. अशा कित्येक वस्तूंना आपल्या पोटात दडवून टाकणाऱ्या किचन ट्रॉली गंजल्या असतील, काळपट- कळकट झाल्या असतील, तर त्या कमी वेळेत (How To Clean Kitchen Trolley In 5 Minutes) आणि कमी मेहनतीत कशा स्वच्छ करायच्या, ते आता पाहूया (easy tricks to clean kitchen trolley)...
किचन ट्रॉली स्वच्छ करण्याचा उपाय
१. पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला १ टेबलस्पून मीठ, २ टेबलस्पून व्हिनेगर आणि १ टेबलस्पून डिश वॉश लिक्विड लागणार असून हा उपाय इन्स्टाग्रामच्या housewife_to_homemaker या पेजवर सुचविण्यात आला आहे.
दिवाळीत घराची साफसफाई करून आजारी पडाल, ५ गोष्टी लक्षात ठेवा- न थकता करा काम
यामध्ये जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर त्याऐवजी लिंबाचा रसही वापरू शकता. सगळ्यात आधी तर किचन ट्रॉली थोड्या ओलसर करून घ्या. नंतर वर सांगितलेले सगळे पदार्थ एकत्र करून मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण घासणीने ट्रॉलीवर लावा आणि थोडंसं घासा. ५ मिनिटे ते तसेच राहू द्या आणि त्यानंतर धुवून टाका. ट्रॉली लगेच स्वच्छ होतील.
२. हार्पिकचा वापर आपण फक्त टॉयलेट किंवा बाथरुम स्वच्छ करण्यासाठीच करतो. पण हार्पिकचा वापर करूनही किचन ट्राॅली खूप पटकन स्वच्छ करता येतात. त्यासाठी एक घासणीच्या साहाय्याने लिक्विड ट्रॉलीवर लावा.
दिवाळीत फराळावर ताव मारला तरी वजन वाढणार नाही, फक्त ३ टिप्स लक्षात ठेवा- वजन राहील कंट्रोलमध्ये
५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर घासून टाका आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मात्र हा उपाय करताना हातात ग्लाेव्ह्ज घालायला विसरू नका. तसेच हार्पिक तुमच्या त्वचेला लागणार नाही, याची काळजी घ्या....