बाथरूमच्या बादल्या रोजच्या वापरात असल्यामुळे ठराविक वेळानंतर काळ्या पडू लागतात. (Home Hacks) काहीजण दीर्घकाळ बाथरूमच्या बादल्या स्वच्छ करत नाहीत. (Cleaning Hacks & Tips) ज्यामुळे बादल्यांवर पिवळेपणा येतो, पिवळेपणा वारंवार येऊ लागला की बादल्यांवर पांढरे, काळे मेणचट डाग पडू लागतात. अशी बादली दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही. (How To Remove Hard Water Bucket) रोजच्या घाई गडबडीत बादल्या स्वच्छ करण्यासाठी वेळ मिळत नाही. (How to Clean Bucket With Shampoo)
बादली गरम पाण्यात घाला
बादली खूपच जास्त खराब झाली असेल तर कोमट पाण्यात बादली बुडवून ठेवा. एका मोठ्या टपात गरम पाणी घाला. बादली एका स्क्रबरच्या मदतीने स्वच्छ करा. यामुळे पिवळेवणा निघून जाईल आणि बादली नव्यासाखी दिसेल. बादलीवर गरम पाणी घालून बादली स्क्रबरच्या मदतीने स्वच्छ करा. या उपायाने बादलीवरचा पिवळेपणा निघून जाईल.
बादलीत शॅम्पू मिसळा
सगळ्यात आधी पाणी आणि शॅम्पूचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण तुम्ही बादलीत घालू शकता. यात व्हाईट व्हिनेगर घाला. या उपायानंतर काही वेळातच बादली स्वच्छ चकचकीत दिसेल. ही बादली तुम्ही गरम पाण्याच्या मदतीनेही स्वच्छ करू शकता.
स्क्रबरचा वापर करू शकता
स्क्रबरच्या मदतीने तुम्ही बादली साफ करू शकता. यासाठी एक हार्ड स्क्रबर घ्या त्यावर काही थेंब शॅम्पू घाला त्यांतर बेकिंग सोडा घालून हे मिश्रण बादलीत घाला. शॅम्पू लावून स्क्रबरच्या मदतीने संपूर्ण बादली स्वच्छ करा. या उपायाने बादली काही मिनिटांतच स्वच्छ दिसेल. लोखंडाच्या बादलीवर गंज लागला असेल तर ते क्लिन करणं कठीण होतं अशावेळी साफसफाई करण्यासाठी चांगल्या गुणत्तेच्या स्क्रबरचा वापर करा. जेणेकरून स्क्रबर खराब होणार नाही आणि साफसफाई व्यवस्थित होईल.
बादली स्वच्छ करण्यासाठी २ कप व्हाईट व्हिनेगर घ्या त्यात थोडं पाणी घाला. नंतर पेस्ट स्पॉन्जमध्ये भिजवून ठेवा त्यात ही पेस्ट स्पॉन्जमध्ये भिजवून घ्या. नंतर बादली रगडून स्वच्छ करा. नंतर साफ स्वच्छ पाण्याने बादली धुवून घ्या. याच्या वापराने बादली स्वच्छ होईल. घाणेरड्या बादल्या स्वच्छ करण्यासाठी पाण्यात हायड्रोजन पेरॉक्साईड मिसळा. यात ब्रश घालून बादली स्वच्छ करून घ्या. या उपायाने बादली काही मिनिटातचं स्वच्छ होईल.