Lokmat Sakhi >Social Viral > तेलकट-चिकट झालेले स्टीलचे डबे न घासता होतील चकाचक, फक्त या जादुई पाण्याचा करा वापर...

तेलकट-चिकट झालेले स्टीलचे डबे न घासता होतील चकाचक, फक्त या जादुई पाण्याचा करा वापर...

Easy Cleaning Tips & Tricks : How To Clean Oily Steel Utensils : How to clean stainless steel Utensils : फराळ ठेवलेल्या डब्यांवरील तेलाचे चिकट - तेलकट डाग स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2024 08:19 PM2024-11-07T20:19:41+5:302024-11-07T20:21:13+5:30

Easy Cleaning Tips & Tricks : How To Clean Oily Steel Utensils : How to clean stainless steel Utensils : फराळ ठेवलेल्या डब्यांवरील तेलाचे चिकट - तेलकट डाग स्वच्छ करण्याची भन्नाट ट्रिक..

Easy Cleaning Tips & Tricks How To Clean Oily Steel Utensils How to clean stainless steel Utensils | तेलकट-चिकट झालेले स्टीलचे डबे न घासता होतील चकाचक, फक्त या जादुई पाण्याचा करा वापर...

तेलकट-चिकट झालेले स्टीलचे डबे न घासता होतील चकाचक, फक्त या जादुई पाण्याचा करा वापर...

दिवाळीचा फराळ बरेच दिवस व्यवस्थित चांगला टिकून राहावा यासाठी आपण स्टीलच्या डब्यांचा वापर करतो. फराळाचे सगळे पदार्थ आपण शक्यतो स्टीलच्याच डब्यांत भरुन ठेवतो. दिवाळीचा फराळ संपवून आत्तापर्यंत सगळ्यांच्याच घरातील डबे रिकामी झाले असतील. फराळ संपल्यावर हे स्टीलचे डबे उघडून पाहिले तर डब्याच्या आतील बाजूस तेलाचे चिकट डाग (Easy Cleaning Tips & Tricks) दिसतात. एवढंच नव्हे तर काहीवेळा पदार्थांतील जास्तीचे तेल उतरुन या डब्यांच्या तळाशी जमा होते.

यामुळे संपूर्ण डबा आतून चिकट - तेलकट होतो. यासोबतच या डब्यांना तेलाचा कुबट वास देखील येतो. असे डबे (How to clean stainless steel Utensils) व्यवस्थित स्वच्छ न धुता त्यात इतर पदार्थ ठेवल्यास त्या पदार्थांना देखील या तेलाचा कुबट वास लागतो, तसेच काहीवेळा हे पदार्थ देखील खराब होण्याची शक्यता असते. फराळ ठेवलेल्या या डब्यांतून तेलाचे चिकट डाग स्वच्छ करणे म्हणजे खूप वेळखाऊ काम असते. असे तेलकट डबे स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा लिक्विड सोपं आणि घासणी किंवा स्क्रबरने दोन ते तीन वेळा घासावे लागतात. यासाठीच फराळाचे चिकट - तेलकट डबे फारसे कष्ट न घेता स्वच्छ करण्यासाठी एका सोप्या ट्रिकचा वापर करुयात(How To Clean Oily Steel Utensils).

फराळ ठेवून चिकट - तेलकट झालेले स्टीलचे डबे कसे स्वच्छ करावेत ? 

फराळ ठेवून तेलकट - चिकट झालेले स्टीलचे डबे स्वच्छ करण्यासाठी आता तासंतास हे डबे घासण्याची गरज नाही. या डब्यातून तेलाचे डाग घालवण्यासाठी एक जादुई सोल्युशन तयार करण्याची सोपी कृती पाहूयात. या जादुई पाण्यात ही तेलकट भांडी फक्त काही वेळासाठी भिजत ठेवायची, आणि भांडी पुन्हा पहिल्यासारखी न घासता स्वच्छ होतात. 

कितीही पिळलं तरी संपत आलेल्या ट्यूबमधली सगळी क्रिम निघत नाही? पाहा ‘ही’ ट्रिक- भन्नाटच...

यासाठी एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात प्रत्येकी दिड टेबलस्पून डिटर्जंट पावडर, बेकिंग सोडा आणि सायट्रिक अ‍ॅसिड घालावे. आता हे पाणी चमच्याच्या मदतीने थोडे हलवून घ्यावे. आता या तयार पाण्यांत हे स्टीलचे डबे - झाकण ५ मिनिटांसाठी संपूर्णपणे व्यवस्थित भिजतील असे बुडवून ठेवावे. 

स्वयंपाकाचीच नाही तर पूजेची भांडीही होतील स्वच्छ - चकचकीत! फक्त दिवाळीतील पणत्यांचा 'असा' करा वापर...

त्यानंतर हे डबे या पाण्यातून बाहेर काढावेत आणि स्वच्छ पाण्यातून पुन्हा एकदा धुवून घ्यावेत. जर आपल्याला ही भांडी अजून स्वच्छ आणि चकचकीत हवी असतील तर भांडी धुण्याचा साबण किंवा लिक्विड सोप आणि घासणीच्या मदतीने पुन्हा एकदा घासून घ्यावीत. अशाप्रकारे आपण दिवाळीचा फराळ ठेवून चिकट - तेलकट झालेले तेलाचे डबे फारसे घासण्याचे कष्ट न घेता देखील पुन्हा नव्यासारखी स्वच्छ करु शकतो.

दिवाळीत सजावट म्हणून वापरलेली गोंड्यांची फुलं, पणत्या फेकून न देता 'असा' करा वापर, कुंडीतील रोपांची वाढ होईल भरभर...


Web Title: Easy Cleaning Tips & Tricks How To Clean Oily Steel Utensils How to clean stainless steel Utensils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.