Lokmat Sakhi >Social Viral > काचेची भांडी फुटली की घरभर काचा पसरतात? हात न लावता लहान-लहान तुकडे पटकन उचलून होतील- १ सोपी ट्रिक

काचेची भांडी फुटली की घरभर काचा पसरतात? हात न लावता लहान-लहान तुकडे पटकन उचलून होतील- १ सोपी ट्रिक

Easy Hack to clean broken glass Mess : हे लहान तुकडे पायात घुसले तर कापण्याची शक्यता असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2023 12:54 PM2023-12-04T12:54:41+5:302023-12-04T12:56:14+5:30

Easy Hack to clean broken glass Mess : हे लहान तुकडे पायात घुसले तर कापण्याची शक्यता असते.

Easy Hack to clean broken glass Mess : Does glassware break or spread glass all over the house? Small pieces will be picked up quickly without touching - 1 simple trick | काचेची भांडी फुटली की घरभर काचा पसरतात? हात न लावता लहान-लहान तुकडे पटकन उचलून होतील- १ सोपी ट्रिक

काचेची भांडी फुटली की घरभर काचा पसरतात? हात न लावता लहान-लहान तुकडे पटकन उचलून होतील- १ सोपी ट्रिक

आपण घरात रोजच्यासाठी स्टीलची भांडी वापरतो पण पाणी आणि चहासाठी काचेचेच ग्लास आणि कप वापरतो. याशिवाय ओव्हनमध्ये लागणारे बाऊल, पाहुणे येणार असतील तर लागणारे क्रॉकरी सेट, काचेच्या बरण्या, सरबताचे ग्लास असं काही ना काही तरी काचेचं किंवा चिनी मातीचं वापरतोच. काचेच्या प्लास्टीक किंवा अॅल्युमिनीअमची भांडी वापरण्यापेक्षा काचेची भांडी वापरणे केव्हाही जास्त चांगले. तसेच ही भांडी डिझायनर असल्याने पाहुण्यांसाठी तरी वापरायला काढतोच. दिसायला छान असली तरी काच फुटण्याची भिती असल्याने ही भांडी अलगद हाताळावी लागतात (Easy Hack to clean broken glass Mess). 

पण कधी ना कधी घाई गडबडीत ही भांडी हातातून खाली पडतात आणि फुटतात. धक्का लागल्याने, ओले किंवा साबणाचे हात लागल्याने भांडी हातातून सटकतात आणि फुटतात. असं झालं की आपलं काम वाढलं म्हणून आणि आपल्या आवडीच्या डिझाईनचा किंवा सेटमधली कप किंवा ग्लास गेल्यामुळे आपल्याला हळहळ होते. फुटलेल्या काचेच्या भांड्यांच्या काचा उचलणं हे एक मोठं आव्हान असतं. कारण याचे लहान लहान तुकडे उडून घरात खूप दूरपर्यंत पसरलेले असतात. हे लहान तुकडे पायात घुसले तर कापण्याची शक्यता असते. त्यामुळे घरात लहान मुलं, वयस्कर मंडळी असतील तर त्यांच्या पायाला लागेल अशी भिती वाटत असल्याने आपण बारकाईने खूपदा केर काढतो, मग फडक्याने पुसतो जेणेकरुन हे तुकडे कुठे शिल्लक राहणार नाहीत. 

(Image : Google)
(Image : Google)

मात्र तरीही एखादा तुकडा आपल्याला काही वेळाने दिसतोच. अगदी बारीक तुकडे केरसुणी किंवा फडक्यानेही उचलले जात नाहीत. काचेचे तुकडे घरात आजुबाजूला राहू नयेत आणि सगळे नीट साफ व्हावे तर एक सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. ही ट्रीक करायला अतिशय सोपी असून फायदेशीर असल्याने ती नक्कीच जाणून घ्यायला हवी. 

काचा साफ होण्यासाठी नेमकं काय करायचं?

काचेचे काही फुटले आणि काचा सगळीकडे पसरल्या की बारीक तुकडे उचलण्यासाठी कणकेच्या गोळ्याचा वापर करायचा. हा कणकेचा गोळी जमिनीवर फिरवल्यास तो चिकट आणि मऊ असल्याने लहान लहान तुकडे त्याला चिकटतातआणि अपघात होण्याची शक्यता टळते. आता कणीक भिजवलेली नसेल तर काय करायचे असा साहजिकच प्रश्न आपल्याला पडेल तर अशावेळी ब्रेडचाही वापर आपण या काचा उचलण्यासाठी करु शकतो. कणीक किंवा ब्रेड जमिनीवर टॅप केला किंवा पुसल्यासारखा केला तर अगदी लहान असलेले काचेचे कण त्याला सहज चिकटतील.  

Web Title: Easy Hack to clean broken glass Mess : Does glassware break or spread glass all over the house? Small pieces will be picked up quickly without touching - 1 simple trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.