घराच्या स्वच्छतेकडे जितकं आपण लक्ष देतो तितकंच लक्ष आपण सौंदर्य प्रसाधनांच्या स्वच्छतेकडे देतो का? कंगवा हे देखील सौंदर्य प्रसाधनच आहे. तुमचा कंगवा स्वच्छ आहे की अस्वच्छ यावर तुमच्या केसांचं आरोग्य अवलंबून असतं हे माहीत आहे का? अस्वच्छ कंगवा (dirty comb cause hair problems) वापरल्यानं केसांच्या मुळांशी संसर्ग होतो, केसात कोंडा होतो, केस कमजोर होवून तुटतात. केसांच्या समस्येमागे आपला अस्वच्छ कंगवा असतो हे कोणाच्या ध्यानीमनीही नसतं. पण हे सत्य आहे. त्यासाठी कंगवा वेळच्या वेळी स्वच्छ करणं (cleaning comb) गरजेचं आहे. अनेक जणांचे कंगवे अस्वच्छ असतात कारण त्यांच्याकडे कंगवा साफ करण्यासाठी वेळ नसतो. किंवा कगवा साफ करणं म्हणजे मोठं वेळखाऊ आणि कटकटीचं काम म्हणून त्याकडे कायम दुर्लक्ष होतं. खरंतर केसांची योग्य काळजी घेण्यासाठी कंगवा स्वच्छ असणं ही प्राथमिक गरज आहे आणि दुसरं म्हणजे कंगवा साफ करायला जराही वेळ आणि कष्ट लागत नाही. कंगवा साफ करण्यासाठी ( tips for cleaning comb easily) सोपी युक्ती आहे वापरुन पाहा!
Image: Google
कंगवा साफ कसा कराल?
1. कंगवा साफ करण्यासाठी आवश्यकतेनुसार गरम पाणी, एक चमचा वाॅशिंग पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा घ्यावा. कंगवा साफ करण्यासाठी टबमध्ये गरम पाणी घ्यावं. त्यात डिटर्जंट पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा घालावा. पाणी खूप घेऊ नये. या पाण्यात अस्वच्छ कंगवे बुडवूनन् ठेवावेत. 10 मिनिटांनी वापरात नसलेल्या टूथब्रशनं किंवा कपडे धुण्याच्या ब्रशनं कंगवा साफ करुन घ्यावा. नंतर थंड पाण्यानं कंगवा धुवून घेतल्यास जुना कंगवाही नवीन कंगव्याप्रमाणे चमकतो.
2. कंगवा स्वच्छ करण्याची दुसरी पध्दत म्हणजे पाणी घ्यावं. त्यात शाम्पू टाकावा. या पाण्यात खराब कंगवे बुडवून 1 तास ठेवावेत. नंतर ब्रशनं कंगवे स्वच्छ करुन पाण्यानं धुवावेत.
Image: Google
3. आठवड्यातून एकदा कंगवे वरील पध्दतीनं स्वच्छ करावेत. अनेकजण टोकदार काडीनं किंवा सूईनं कंगव्यातला मळ काढतात. पण या पध्दतीनं कंगव्यातला मळ वरवर निघतो. पण कंगव्याच्या दातातला तेलकटपणा तसाच राहातो. वरील पध्दतीनं कंगवा स्वच्छ करण्यासाठी ना जास्त वेळ लागतो ना जास्त कष्ट पडतात.