Join us  

भाजलेल्या शेंगदाण्याची फोलपटं काढताना खूप कचरा होतो? १ सोपी ट्रीक, फोलपटं निघतील चटकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2023 9:13 AM

Easy Kitchen Hack How To Remove Cover of peanuts without making mess : वाऱ्याने काही क्षणात ती सालं घरभर पसरतात आणि सगळीकडे कचरा होतो.

शेंगादाणे हे आपल्याकडे अतिशय आवडीने खाल्ली जाणारी गोष्ट. स्वयंपाकात तर अनेकदा आपल्याला हे दाणे लागतातच. पोहे, उपमा यांसारखे पदार्थ असोत किंवा भाजीत दाण्याचा कूट घालायचा असो शेंगादाण्यांना पर्याय नसतो. पण हे दाणे बाजारातून आणले की आपण ते कच्चे वापरत नाही. हे दाणे भाजून त्याची फोलपटं काढून ठेवले जातात. दाण्यांना पावसाळी किंवा दमट हवेमुळे भुरा लागू नये म्हणूनही ही प्रक्रिया अतिशय आवश्यक असते. दाणे कढईमध्ये मंद आचेवर चांगले भाजल्यानंतर त्यांची फोलपटं दाण्यापासून वेगळी होतात. दाण्याचा कूट करायचा असेल किंवा दाणे थेट खायचे असतील नाहीतर एखाद्या पदार्थात वापरायचे असतील तर ही फोलपटं चांगली लागत नाहीत. त्यामुळे ही फोलपटं पाखडली जातात (Easy Kitchen Hack How To Remove Cover of peanuts without making mess). 

(Image : Google)

स्वयंपाकघरातील काम म्हटल्यावर त्याठिकाणी होणारा पसारा आणि कचरा ओघानेच आला. आता भाजलेले शेंगादाणे पाखडायचे आणि सालांपासून वेगळे करायचे म्हणजे वजनाने हलकी असलेली ही सालं घरभर पसरतात. साधारणपणे आपण फुंकर मारुन ही सालं वेगळी करतो आणि नंतर ती गोळा करतो. यासाठी ताट, वर्तमानपत्र असं काहीही घेतलं तरी वाऱ्याने काही क्षणात ती सालं घरभर पसरतात आणि सगळीकडे कचरा होतो. मग हा कचरा साफ करण्याचे एक नवीन काम आपल्या मागे लागते. घाईच्या वेळात आपल्याकडे हे सगळं करायला इतका वेळ असतोच असं नाही. पण आपल्याला स्वयंपाकासाठी सालं काढलेले दाणेही हवे असतात. मग कचरा न करता शेंगदाण्याची ही सालं कशी काढता येतील याची १ सोपी ट्रीक आज आपण पाहणार आहोत. 

१. तर सुरुवातीला दाणे भाजून ते थोडे थंड होऊ द्यायचे. 

२. त्यानंतर हे दाणे हातामध्ये घेऊन न पाखडता चक्क भाजी धुण्याच्या गोलाकार जाळीमध्ये घ्यायचे. 

३. ही जाळी चाळणीप्रमाणे व्यवस्थित हळूवार हलवली की त्यातूल सालं आपोआप खाली पडतात.

४.  या जाळीला आडवी जागा असल्याने ही साले अगदी सहज खाली पडू शकतात आणि फारसा कचराही होत नाही. 

५. तसेच अगदी कमी वेळात सालं काढलेले शेंगादाणे आपल्याला मिळत असल्याने ही ट्रीक तुम्ही नक्की ट्राय करुन बघा.

 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.