Join us  

उकडलेला बटाटा सोलताना हात पोळतात? १ सोपी ट्रिक, हात न लावता सोलून होईल बटाटा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2023 1:43 PM

Easy method of Peeling hot boiled potato Kitchen Tips : हाताला चटके बसू नयेत यासाठी एक सोपी ट्रिक

बटाटा हा आपल्या स्वयंपाकातील एक प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ असतो. नाश्त्याचे पदार्थ करण्यासाठी, भाजीमध्ये भर घालण्यासाठी, पराठे, पावभाजी, कटलेट अशा सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला उकडलेले बटाटे लागतात. हे बटाटे आपण कुकरमध्ये उकडायला लावतो खरे पण ते बाहेर काढल्यानंतर इतके गरम असतात की त्याची सालं काढताना हात पोळतात. मग थोडे गार पाण्याखाली धरुन आपण हे बटाटे गार होण्याची वाट पाहतो. पण त्याची वाफ आतपर्यंत गेली असल्याने ते लगेच गार होत नाहीत (Easy method of Peeling hot boiled potato Kitchen Tips). 

दुसरीकडे आपल्याला स्वयंपाकाची घाई असल्याने आपण हाताला चटके बसत असतानाही सालं कशीबशी काढतो. मग चटके बसून हाताची बोटं लालबुंद होतात आणि काहीवेळा त्यांची आगही होते. पण असे हाताला चटके बसू नयेत यासाठी एक छोटीशी ट्रिक वापरली तर आपण बटाट्याची सालं झटपट काढू शकतो. या ट्रिकमुळे बटाटा अगदी सहज स्मॅश होऊ शकतो. यात आपल्या हाताला अजिबात चटका बसत नसल्याने ही ट्रिक कशी वापरायची पाहूया...(Easy method of Peeling hot boild potato Kitchen Tips). 

(Image : Google)

१. उकडलेले बटाटे एका ताटलीत काढून सुरीने आधी अर्धे चिरुन घ्यायचे. सुरीने सालं काढतानाही बटाटा हातात धरावा लागत असल्याने चटके बसण्याची शक्यता असते.

२. त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आणि हा अर्धा केलेला बटाटा झाऱ्यामध्ये ठेवायचा. हा झाऱ्या पुऱ्या तळतो त्या मोठ्या तारेचा असेल तर जास्त चांगले. वाटीने हा बटाटा सालावरुन दाबायचा. 

३. यामुळे बटाटा झाऱ्याच्या खाली जाईल आणि साल वरच्या बाजूला राहील ते काढून बाजूला फेकून द्यायचे. 

४. यामध्ये बटाट्याचा हाताला स्पर्श होत नसल्याने तो गरम लागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 

५. ताटलीमध्ये स्मॅश केलेला बटाटा पडल्याने हाताने किंवा आणखी कशाने तो स्मॅश करण्याचीही चिंता राहत नाही. 

६. अशाप्रकारे घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा वापर करुन आपण आपली दैनंदिन कामे सोपी करु शकतो. 

टॅग्स :सोशल व्हायरलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स