Join us  

घाईघाईत कपड्यांवर सांडतं-डाग पडतात, केमिकल्स न वापरता डाग काढण्याची १ सोपी ट्रिक, कपडे होतील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 10:33 AM

Easy Natural Hack to Remove stain on cloth : ड्रायक्लिनचा खर्चही खूप जास्त असल्याने एखाद्या छोट्याशा डागासाठी पूर्ण कपडे ड्रायक्लिनला टाकणे शक्य नसते.

सणवार आले की आपली नुसती धांदल उडते. एकीकडे रोजची कामं, ऑफीसच्या कामाचा ताण, रस्त्यांवर असणारी ट्रॅफीक, खरेदी, घरातली साफसफाई आणि एक ना अनेक गोष्टी. या सगळ्यामध्ये स्वयंपाक आणि इतर कामं करताना आपली धावपळ होते आणि त्यातच आपल्या हातातून काहीतरी सांडते, फुटते. ही सांडलेली गोष्ट आपल्या अंगावर पडली तर आपल्या कपड्यांवर त्याचे डाग पडतात. अनेकदा ऑफीसमध्ये घाईघाईत जेवताना किंवा ऑफीसला निघताना डबा भरताना भाजीचे तेल किंवा काहीही कपड्यांवर सांडते आणि चांगले महागडे कपडे खराब होतात. अनेकदा हे कपडे ब्रँडेड असल्याने ते लगेच बाद करणेही शक्य नसते (Easy Natural Hack to Remove stain on cloth). 

कपड्यांवरचे हे डाग मशीनमध्ये किंवा काही वेळा हाताने घासूनही निघत नाहीत. अशावेळी हे कपडे आपल्याला पुन्हा घालता येत नाहीत. मग ते बरेच दिवस कपाटात मागे लोळत राहतात. ड्रायक्लिनचा खर्चही खूप जास्त असल्याने एखाद्या छोट्याशा डागासाठी पूर्ण कपडे ड्रायक्लिनला टाकणे शक्य नसते. अशावेळी घरच्या घरी कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी नेमकं काय करायचं असा प्रश्न असेल तर आज आपण एक अतिशय सोपा उपाय पाहणार आहोत. कोणतेही सोल्यूशन किंवा केमिकल न वापरता अतिशय नैसर्गिक पद्धतीने हा डाग काढल्यामुळे कपडाही खराब होण्याची चिंता नसते. पाहूयात हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा.  

१. बर्फाचा एक खडा घ्यायचा आणि डाग पडलेल्या ठिकाणी हा खडा घासायचा. त्यानंतर किमान ५ ते १० मिनीटे हा बर्फाचा खडा या डाग पडलेल्या ठिकाणी तसाच ठेवायचा. 

२. त्यानंतर हा कपडा सूर्यप्रकाशात वाळत घालायचा. हा डाग लगेचच निघून गेलेला आपल्याला दिसून येतो. 

३. अनेकदा कपड्यांवरचे डाग हे पिवळ्या, लाल किंवा निळ्या, काळ्या रंगाचे असतात. ते सहजासहजी निघत नाहीत. 

४. अशावेळी हा नैसर्गिक आणि अतिशय सोपा असा उपाय एकदा नक्की ट्राय करा. खराब झालेले कपडे झटपट स्वच्छ होण्यास याची चांगली मदत होईल. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडी