Lokmat Sakhi >Social Viral > यंदाच्या दिवाळीत घरीच करा सोफा ड्रायक्लीन; पैसे वाचतील, सोफा दिसेल एकदम नव्यासारखा..

यंदाच्या दिवाळीत घरीच करा सोफा ड्रायक्लीन; पैसे वाचतील, सोफा दिसेल एकदम नव्यासारखा..

easy Sofa dry cleaning tips Diwali cleaning : सोफ्यात बसलेली धूळ, डाग काढायचे असतील तर फार पैसे न घालवता घरच्या घरी करता येतील असे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2024 11:42 AM2024-10-25T11:42:51+5:302024-10-25T12:53:47+5:30

easy Sofa dry cleaning tips Diwali cleaning : सोफ्यात बसलेली धूळ, डाग काढायचे असतील तर फार पैसे न घालवता घरच्या घरी करता येतील असे उपाय...

easy Sofa dry cleaning tips Diwali cleaning : Dry clean your sofa at home this Diwali; The money will be saved, the sofa will look like new.. | यंदाच्या दिवाळीत घरीच करा सोफा ड्रायक्लीन; पैसे वाचतील, सोफा दिसेल एकदम नव्यासारखा..

यंदाच्या दिवाळीत घरीच करा सोफा ड्रायक्लीन; पैसे वाचतील, सोफा दिसेल एकदम नव्यासारखा..

दिवाळी म्हटली की घराची साफसफाई, रंगरंगोटी या गोष्टी ओघानेच येतात. एरवी आपण वरचेवर साफसफाई करतो पण दिवाळीच्या निमित्ताने आपण घराचे डीप क्लिनिंग करतो. वर्षभर धूळ बसून घरातले फॅन, सोफे, कुशन खराब झालेले असतात. सोफा स्वच्छ करायचा म्हणजे त्याच्या खाचाखोचांमध्ये अडकलेले कण, माती काढावी लागते. हल्ली अशी सर्व्हीस देणारे लोक आहेत, पण त्यासाठी भरपूर पैसे मोजावे लागतात (easy Sofa dry cleaning tips Diwali cleaning)..

नाहीतर आपण सोफ्याचे कव्हर ड्रायक्लीनला टाकतो. पण तरी ते म्हणावी तसे स्वच्छ होतेच असे नाही. बाहेर कापड ड्रायक्लीनला दिलं की सोफ्याचं कापड खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सोफा स्वच्छ कसा करणार हा मोठा प्रश्न अनेकांना पडतो. याचसाठी आज आपण घरच्या घरी करण्यासारख्या काही सोप्या ट्रीक्स पाहणार आहोत. यामुळे सोफा अगदी झटपट स्वच्छ होईल. या ट्रिक्स कोणत्या पाहूया ..

(Image : Google)
(Image : Google)

 
१. व्हॅक्युम क्लीनर – सर्वात आधी व्हाक्युम क्लीनरने सोफा आणि कुशन स्वच्छ करून घ्यावे. ज्यामुळे त्यातील कानकोपर्‍यातली धूळ, माती साफ होईल. यानंतर घरगुती उपायांनी ड्राय क्लिनिंग करता येते. पण ड्राय क्लिन करण्याआधी त्यातली धूळ, माती पूर्णपणे निघालेली हवी. सोफा किंवा कुशनवरचे डाग यामुळे ब्रश न लवताही साफ करता येतील. जेणेकरुन महागाचे किंवा सिल्क, वेल्वेटचे कव्हर असेल तर ते खराब होणार नाही. 
 
२. बेकिंग सोडा – बेकिंग सोडा हे नैसर्गिक क्लिंझर म्हणून काम करते. त्यामुळे डाग काढण्यासाठी बेकींग सोडा अत्यंत उपयुक्त ठरतो. यासाठी डाग पडलेल्या ठिकाणी चिमूटभर बेकिंग सोडा पसरवावा. मग 2,3 तास ते तसेच ठेवावे. नंतर पुन्हा व्हॅक्युम क्लीनरने बेकिंग सोडा साफ करून घ्यावा. असे केल्याने कुशनवरचे डाग सहज स्वच्छ होतील आणि ओले करण्याचीही गरज पडणार नाही. 

(Image : Google)
(Image : Google)

३. व्हीनेगर – हे एक नैसर्गिक जंतुनाशक आहे. एका स्प्रे बाटलीत अर्धा कप व्हीनेगर आणि तेवढेच पाणी एकत्र करून घ्यायचे. सोफा कव्हरला ज्याठिकाणी डाग आहेत तिथे हे पाणी स्प्रे करावे आणि काहीवेळ तसेच राहू द्या. नंतर ओल्या कापडाने हलके पुसून घ्यावे. मग हे कव्हर हवेशीर ठिकाणी ठेवून सुकवावे. यामुळे ते कव्हर निर्जंतुक व चमकदार होते. 
 

 

Web Title: easy Sofa dry cleaning tips Diwali cleaning : Dry clean your sofa at home this Diwali; The money will be saved, the sofa will look like new..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.