सगळ्यांच्या घरात रोजच्या स्वयंपाकात कोथिंबीरीचा वापर केला जातो. जास्तीची कोथिंबीर आणून ठेवली तर ती सवच्छ, साफ करावी लागते. अन्यथा कोथिंबीर लवकर खराब होते. काहीजण कोथिंबीर निवडून चिरून डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवतात पण हे सगळं करण्यात खूप वेळ जातो. या लेखात कोथिंबीर पटापट निवडण्याच्या काही ट्रिक्स सांगणार आहोत जेणेकरून तुमचं काम सोपं होईल. ( How to Store Coriander/Cilantro Leaves for 2-3 weeks) कोथिंबीर बाजारातून विकत आणली आणि पटकन निवडली नाही तर ती वाळून जाते, कोमेजते. कोथिंबीर छान फ्रेश ठेवायची तर या काही टिप्स
1) हात धुवा
कोथिंबीर धुण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही तुमचे हात स्वच्छ करा आणि कमीतकमी 20 सेकंदांपर्यंत तुमचे हात चांगले धुवा. कारण तुमच्या हातावर कोणतेही बॅक्टेरिया असल्यास ते तुमच्या कोथिंबिरीवर येऊ शकतात. त्यामुळे हिरवी कोथिंबीर धुण्यापूर्वी किंवा कापण्यापूर्वी हात चांगले धुवा.
2) व्हिनेगर
हिरवी कोथिंबीर वापरण्याआधी ती बॅक्टेरियामुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कोथिंबीर व्हिनेगरच्या पाण्यात 10 ते 15 मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चांगले धुवा. असे केल्याने कोथिंबीरवरील सर्व बॅक्टेरिया साफ होतील.
3) पाण्यानं स्वच्छ धुवा
यानंतर कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवा. कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुतल्याने व्हिनेगरचा प्रभाव तर कमी होईलच शिवाय त्यातील मातीही साफ होईल. हे करण्यासाठी, तुम्हाला एका भांड्यात हिरवी कोथिंबीर घालावी लागेल आणि नंतर काही वेळ स्वच्छ पाण्यात ठेवावी लागेल. नंतर चॉपिंग बोर्डवर ठेवून कोथिंबीर कापून घ्या . आता तुम्ही कोथिंबीर प्लास्टीकच्या डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता.